ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक – जॉन बेली

829

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसची (ऑस्कर ॲवार्डस) ख्याती जगभरात असून ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक असल्याचे ऑस्कर ॲकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी आज सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेस ऑस्कर ॲवॉर्डसचे अध्यक्ष जॉन बेली,त्यांच्या पत्नी आणि ऑस्कर ॲकॅडमीच्या गर्व्हनर कॅरल लिटलटन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे,सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते श्री.बेली यांनी यावेळी सांगितले की,आज भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते त्यामुळेच या बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहे मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल. त्यामुळे भारतातून परतल्यानंतर आपल्या ऑस्कर ॲकॅडमीच्या बैठकीत मुंबईतील कार्यालयाबाबत आपण प्रस्ताव ठेवू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आज आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सिनेमांमध्ये भारतीय सिनेमांचे अस्तित्व अधिकाधिक दिसावे याबाबत आपण सुद्धा आग्रही असल्याचे श्री.बेली यांनी सांगितले. आज वर्षभरात भारतात 1800सिनेमांची निर्मिती होते,ही संख्या हॉलिवूड सिनेमापेक्षा चार पटीने अधिक आहे आज भारतीय सिनेमांची कथा,मांडणी आणि सिनेमा बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान यामुळे आपण प्रभावित आहोत सध्या ॲकॅडमीच्या विविध विभागात928सदस्य वेगवेगळया56देशातील आहेत येणाऱ्या काळात ऑस्कर ॲकॅडमीवर भारताचे विविध सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग द्यावा जेणेकरुन भारतीय सिनेमा जगभर पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा श्री.बेली यांनी यावेळी व्यक्त केली. पत्रकार परिषदेपूर्वी जॉन बेली आणि कॅरॉल लिटलटन यांनी श्री. तावडे यांची सेवासदन येथे भेट घेतली.यावेळी झालेल्या बैठकीत श्री. तावडे यांनी ऑस्कर ॲकॅडमीमध्ये बनत असलेल्या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कांस्य पुतळा असावा अशी मागणी केली तसेच आज ऑस्कर ॲवॉर्डमध्ये भारतीय चित्रपटसृष्टी अधिकाधिक जोडली जावी अशी मागणी केली. राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला बेली दाम्पत्याची विशेष उपस्थिती-विनोद तावडे 56वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा उद्या म्हणजेच26मे रोजी संध्याकाळी6:30वाजता वरळी येथील येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास ऑस्कर ॲकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करुन मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्या मार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे जॉन बेली यांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहावे यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक सचिव भूषण गगराणी व ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी विशेष प्रयत्न केले.
जॉन बेली आणि लिटलटन बेली यांच्याविषयी जॉन बेली हे गेली2वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष आहेत.ऑस्कर अकादमीच्या सिनेमॅटोग्राफर विभागातून त्यांची ही निवड झाली आहे. कॅलिफोर्निया येथील स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट येथून त्यांनी पदवी प्राप्त केली अमेरिकन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्स या जीवनगौरव पुरस्कार श्री. बेली यांना प्राप्त झाला आहे कॅरॉल लिटलटन या व्यवसायाने फिल्म एडिटर असून त्यांनी30हुन अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. हॉलिवूडचे सुप्रसिध्द दिग्दर्शक स्टीवन स्पिलूबर्ग यांच्या गाजलेल्या’इट इ एक्सट्रा टेरिटेरिअल’ या चित्रपटाचा ही समावेश आहे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे56वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. याशिवाय व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार,राज कपूर विशेष योगदान या सर्वोच्च पुरस्काराचे वितरण सुध्दा उद्या होणार आहे राज्य शासनाचे चित्रपती व्ही.शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित वामन भोसले,परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी,भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार घोषित 56व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्काराची घोषणा केली.मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय,संगीत,निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे,अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार5 लक्ष रुपयांचा तर विशेष योगदान पुरस्कार3लक्ष रुपयांचा आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या मान्यवरांची सन2019च्या पुरस्कारांसाठी निवड केली सुषमा शिरोमणी यांनी सन1985साली बालकलाकार म्हणून “सोने की चिडीया”, “लाजवंती”या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. सन1969साली“सतीचे वाण”या चित्रपटात सहनायिका म्हणून तसेच “दाम करी काम”या चित्रपटात मुख्य नायिका साकारली अभिनयाच्या जोडीने चित्रपट, पटकथाकार,निर्मिती, दिग्दर्शन आणि वितरण अशा विविध भागात आपल्या कर्तृत्वाचा विलक्षण ठसा त्यांनी उमटवला आहे1977 मध्ये“भिंगरी”या चित्रपटाची निर्मिती केली भरत जाधव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन1985मध्ये शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीर साबळे यांच्या “महाराष्ट्राची लोकधारा” मधून केली भरत जाधव यांनी“सही रे सही”, “श्रीमंत दामोदर पंत”, “ऑल दबेस्ट”आणि “आमच्यासारखे आम्हीच”या नाटकांतून तसेच“गलगले निघाले”, “साडे माडे तीन”, “मुंबईचा डबेवाला”, “पछाडलेला”,“जत्रा”, “खबरदार”या सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. याचबरोबरसन1999 मध्ये “वास्तव-द रियालिटी”या हिंदी चित्रपटात भूमिका केली आहे भरत जाधव यांचे “सही रे सही”या नाटकाचे एका वर्षात565प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली होती याचप्रमाणे “सही रे सही”या नाटकाचे“अमे लई गया,तमे रही गया” या नावाने गुजरातीत भाषांतर झाले या गुजराथी नाटकात शर्मन जोशी यांनी काम केले होते व त्या गुजराथी नाटकाचे20महिन्यात 350प्रयोग झाले होते. याच नाटकाचे हिंदीतही भाषांतर झाले आणि त्यात जावेद जाफरी यानी काम केले.
वामन भोसले़ यांचे बालपण गोव्यातील पामबुरपा या छोटया गावात गेले व तेथे शिक्षण घेऊन सन1952मध्ये ते मुंबईमध्ये आले बॉम्बे टॉकीज या त्या काळातील एका प्रतिष्ठित चित्रपट निर्मिती संस्थेत संकलक डी.एन.पै यांच्याकडे आपण उमेदवारी सुरु केली नवीन गोष्टी शिकण्याच्या स्वभावानुसार त्यांची ओळख गुरुदास शिराली यांच्याशी झाली1969 मध्ये दिग्दर्शक राज खोसला यांनी राजेश खन्ना व मुमताज यांची भूमिका असलेल्या“दो रास्ते”याचित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सोपवली व त्यांनी या चित्रपटाला उत्तम न्याय दिला वामन भोसले यांना सन1978साली “इन्कार”या चित्रपटासाठी आपणास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच“बिमल रॉयट्रॉफी”,मामी चित्रपट महोत्सवामध्ये सन2003 साली सन्मानित करण्यात आले.
परेश रावल यांचे बालपण विलेपार्ले येथे गेले ते दहा-अकरा वर्षाचे असताना कुतुहल म्हणून नवीनभाई ठक्कर ओपन थिएटर मध्ये जाऊ लागले,तेथूनच त्यांना गुजराती नाटकाची आवड लागली.श्री रावल यांनी चित्रपट,रंगभूमी व दूरदर्शन या तीनही माध्यमातून भूमिका साकारली आहे हिंदी चित्रपटातून भूमिका साकारताना ते कधीच स्टारडमच्या आहारी गेले नाहीत.“हेरा फेरी”, “हंगामा”,“अंदाज अपना अपना”,“चाची420”, “फिर हेरा फेरी” याचित्रपटातून त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारली आहे2014 साली त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्य शासनाच्या वतीने यंदा56व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे दि.26मे2019रोजी सायं.6:30वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याप्रसंगी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष श्री जॉन बेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ऑस्कर ॲकॅडमीच्या अध्यक्षांनी घेतली सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची भेट

ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसचे(ऑस्कर अकादमी)अध्यक्ष जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटन यांनी आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या सेवासदन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
मंत्री श्री.तावडे यांनी जॉन बेली यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या बैठकीत श्री.तावडे यांनी ऑस्कर ॲकॅडमीमध्ये बनत असलेल्या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कांस्य पुतळा असावा अशी मागणी केली.ऑस्कर अकादमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. भारतासह मुंबईमधील मराठी चित्रपटसृष्टी व हिंदी चित्रपटसृष्टी त्याचप्रमाणे भारतीय चित्रपट या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.
या प्रसंगी ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज,सौ.वर्षा तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.