पत्रकार मारहाण प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारले निवेदन

782

रायगड, गिरीश भोपी,

: लिबागमध्ये आज पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. यावेळी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना निवेदन दिले.

निवडणूक आयोगाची परवानगी न घेता मतमोजणी केंद्रात बेकायदा प्रवेश केल्याबद्धल आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील यांच्या विरोधात भादवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाची चौकशी जलदगतीने व्हावी, हर्षद कशाळकर या पत्रकारावर हल्ला प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवावा , सीसीटीव्ही चित्रीकरण मिळावे अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

उपजिल्हाधिकारी मठपती यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन स्वीकारले व त्यावर योग्य ती कार्यवाही होईल असे सांगितले.

दरम्यान पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे आणि पत्रकार संरक्षण समितीचे सचिव अनिल चौधरी यांनी गंबीर दखल घेतली असून लवकरच रायगडचे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आमदारांवर कठोर कारवाईची मागणी करणार आहेत.