पुणे जिल्ह्याचा ६०,६३० कोटी रुपयांचा पत आराखडा जाहीर

798

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

पुणे जिल्ह्याचा सन २०१९-२० या वार्षाचा ६०,६३० कोटी रुपयांचा  वार्षिक पतपुरवठा आराखडा  जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला असून या पत आराखड्याचे प्रकाशन दि.२७/५/१९ रोजी मा. जिल्हाधिकारी पुणे श्री.नवलकिशोर राम,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक व प्रभारी अतिरिक्त सी ई ओ जिल्हा परीषद पुणे श्री.प्रभाकर गावडे यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र परीमंडल पूर्व क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री.सुधीर कुलकर्णी, भारतीय रिझर्व बँकेचे एल.डी.ओ. श्री.बी.एम.कोरी, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्री.नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. आनंद बेडेकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पत आराखाड्याची वैशिष्ट्ये सांगताना जिल्हाधिकारी श्री.नवलकिशोर राम म्हाणाले की हा पत आराखाडा ६०,६३० कोटीरुपयांचा असून मागील वर्षापेक्षा तो ८ % टक्क्यांनी अधिक आहे. प्राथमिकता क्षेत्रासाठी ३७,४६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती एकून पतपुरवठ्याच्या 62% टक्के आहे. कृषी कर्जासाठी ६५५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी १७ % टक्के एवढे आहे.कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती, फ़ुले व फ़ळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रीकीकरण, राष्ट्रीय फ़लोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

पतपुरवठा आराखाड्यात सुक्ष्म,लघु व मध्यम (एम.एस.एम.इ.) साठी २२९०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंरोजगार योजनांसाठी, शैक्षणिक कर्जासाठी, गृहकर्जासाठी, छोट्या व्यवसायासाठी ८००९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामिण बँकेसह ४१ बँकांच्या १७९४ शाखांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी दिनांक ३१.३.२०१९ अखेर प्राथमिकता क्षेत्रात रुपये ३५,१०८  कोटी रुपयांचे मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) वाटप करून आराखड्याची 100% उदिष्ट पुर्ती केलेली आहे.

सदर उद्दिष्ठ पूर्तीसाठी जिल्हाधिकारी श्री.नवल किशोर राम यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व सर्व बँकांचे अभिनंदन करून चालू आर्थिक वर्षात अधिक गतीने उद्दिष्ठ पूर्ण होईल हा विश्वास व्यक्त केला.