स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

651

शैलेंद्र चौधरी नंदरबार,

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते,उद्योग मंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा,पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.तसेच उपस्थित मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000

चार अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे
शिक्षण निरिक्षकांचे आवाहन

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम2009मधील कलम18नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता/ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही.मात्र शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 4 शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत.या 4 शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये,असे आवाहन शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळा
1.मदर तेरेसा स्कूल, ब्लॉक नंबर12,राजीव गांधी नगर,
ट्राँझीट कँम्प, 90 फुटरोड, धारावी, मुंबई- 17
2.एन.आय.ई.एस. इंग्लिश सेकंडरी स्कूल, धारावी ट्राँझीट कँम्प,
न्यू स्कुल कम्पाऊंड, धारावी,मुंबई-17
3.छबिलदास प्राथमिक शाळा(सी.बी.एस.ई.बोर्ड), दादर(पश्चिम),मुंबई-28
4.मदनी हायस्कूल,1ला मजला,साबू सिद्दीकी मुसाफिरखाना,क्रॉफर्ड मार्केट,मुंबई
0000

हिवरेबाजार:समृध्द गाव’
‘दिलखुलास’ मध्ये सरपंच पोपटराव पवार
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास’कार्यक्रमात ‘हिवरेबाजार:समृध्द गाव’या विषयावर हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. 29,गुरुवार दि.30, शुक्रवार दि.31आणि शनिवार दि.1जून रोजी सकाळी7:25ते7:40 या वेळेत प्रसारित होणार आहे.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील आधीचे आणि आताचे हिवरेबाजार,गावात गेल्या तीस वर्षात झालेले बदल,ग्रामविकासाचा आराखडा,विकास योजना राबविण्यासाठी गावकऱ्यांचे केलेले मतपरिवर्तन,गावच्या विकासाकरिता मिळालेली प्रेरणा,गावात मे महिन्यातही पाण्याची कमतरता जाणवत नाही त्याची कारणे आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.पवार यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

टँकर/पाणी पुरवठा
2011 ऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन
पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश
पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना 2011 च्या लोकसंख्येऐवजी यापुढे सध्याची लोकसंख्या विचारात घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली.
टँकरने पाणी पुरवठा करताना सध्या प्रचलित पद्धतीने2011ची लोकसंख्या विचारात घेऊन पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे लोकसंख्येत वाढ झालेली असल्याने अपुरा पाणी पुरवठा होत होता. याबाबत लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार सध्याच्या लोकसंख्येचा घटक विचारात घेण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.ग्रामीण भागात प्रतिमाणसी20लिटर पाणी पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याशिवाय पशुधनासाठीही सुव्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मोठ्या जनावरांसाठी प्रती जनावर प्रतिदिन35 लिटर,वासरांसाठी(लहान जनावरे)10लिटर तर शेळ्या मेंढ्यांसाठी3लिटर इतका दैनंदिन पाणी पुरवठा करण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत,असेही श्री. खोत यांनी स्पष्ट केले.
००००

मुंबई/दुष्काळ/उपसमिती बैठक
राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करणार
चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय
मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये,चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृहे सुरू करण्याचे निर्देश देखील श्री.पाटील यांनी यावेळी दिले.मंत्रालयात दुष्काळावरील उपाय योजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.त्यावेळी श्री.पाटील यावेळी बोलत होते. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर,पदुम मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,विविध विभागांचे अपर मुख्य, प्रधान सचिव,सचिव उपस्थित होते.यासंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री श्री.पाटील म्हणाले,राज्यात सध्या 6209टॅंकर्सच्या माध्यमातून4920गावे आणि10हजार506 पाड्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे.राज्यात नाशिक,पुणे,औरंगाबाद विभागात एकूण1501 चारा छावण्या सुरू आहेत.त्यामध्ये सुमारे10 लाख4हाजर684 जनावरे आहेत. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना111 कोटी,पुणे चार आणि नाशिक विभागीय आयुक्तांना47कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
छावण्यांमधील जनावरांच्या सोयीसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात.अशावेळी महिलांसाठी त्याठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे उभारावीत,अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.चारा छावण्यांचे बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून तातडीने अदा करावेत.त्यात विलंब करू नये.ज्यांना शेतीच्या कामासाठी बैल दिवसभरासाठी न्यायचा आहे, त्यांना ते घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
राज्यात लहान व मोठ्या जनावरांसाठी छावण्या आहेत मात्र शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात प्रथमच छावण्या सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी आता पर्यंत 34लाख शेतकऱ्यांना 2200कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
००००