मनसेच्या वतीने लुल्लानगर उड्डाणपुलाचे औपचारिक उद् घाटन संपन्न

1002

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वंसत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका आरती बाबर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मा. स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, मुलानी तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी लुल्लानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचे एका दुचाकीस्वाराच्या हस्ते औपचारिक उद् घाटन  करून उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी वाहनचालकांना गुलाब पुष्प तसेच पेढे वाटून उड्डाणपूल सुरु करण्यात आला. उड्डाणपूल खुला झाल्याने वाहनचालकांनी आंनद व्यक्त करून नगरसेवकांना धन्यवाद देत होते.दरम्यान याच उड्डाण पुलाचे येत्या २ जून रोजी खासदार गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते उद् घाटन  होणार आहे.  यावेळी बोलताना नगरसेवक वंसत मोरे यांनी स्थानिक आमदार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. या पुलाचे संपूर्ण काम हे पुणे महानगरपालिकेच्या खर्चातून झाले असून त्यासाठी १४ कोटी ५० लाख खर्च आला आहे. आमदार यांनी एकही रुपया या पुलाच्या कामासाठी दिलेला नसताना ते कसे काय या पुलाचे उद् घाटन करणार असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला. जे आमदार आपल्या गावातील स्मशानभूमीचा प्रश्न गेली २० वर्षे सोडवू शकत नाही ते काय विकासाच्या गप्पा मारत आहेत. आज हडपसर विधानसभा मतदार संघात पाणी प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावर काय उपाययोजना केला असा प्रश्न देखील त्यांनी आमदार टिळेकर यांना विचारला. फक्त कचरा प्रकल्प आणून त्यातून काही आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. कात्रज तलावाचे वाटोळे स्थानिक आमदारांनी  केल्याची टीका देखील यावेळी मोरे यांनी आपल्या भाषणात केली. उड्डाण पुलाच्या कामावेळी एकदा ही भेट न दिलेले आज पूल पूर्ण झाल्यावर आयुक्तांना घेऊन पुलाची पाहणी करतात , तसेच पुलाचे काम गेल्या पंधरा दिवसापूर्वीच पूर्ण झाले असून त्यावेळी आचारसंहिता असल्याने आम्ही मीलेट्री(लष्काराच्या) जवानांच्या हस्ते करायचे  असे मनपास सुचवले होते. हा पूल जनतेच्या कररूपी पैशांतून झालेला आहे,  त्यामुळे जनतेच्या हस्ते आम्ही या पुलाचे उद् घाटन  करत आहोत , आणि जर पुला बंद करायचा प्रयत्न झाल्यास त्याला मनसे स्टाईल ने उत्तर देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.  याप्रंसगी अमित जगताप, सतीश निवृत्ती शिंदे, शेखर लोणकर, अमोल शिरस, राहुल पांडागळे, सतीश शिंदे, हर्षल बाबर, योगेश बाबर, राजू शिवशरण, रुपेश बाबर तसेच महिला आणि मनसे, राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.