डॉ.पायल तडवी यांच्या मृत्यप्रकरणी कठोर कारवाई करावी; हिना गावित

1127

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

डॉक्टर पायल तडवी या आदिवासी तरुणीवर जो अन्याय आणि अत्याचार झालेला आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते तसेच या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपणे चौकशी होऊन दोषींवर विनाविलंब कार्यवाई करावी अशी विनंती या पत्राद्वारे शासनाला करीत आहे महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारच्या रॅगिंगच्या घटना घडाव्यात पुरोगामी महाराष्ट्रात हे दुर्दैवी आहे डॉक्टर पायल पडवीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्वांवरच कडक स्वरुपाची कार्यवाई व्हावी तसेच ही घटना पुन्हा होऊ नये म्हणून आवश्यक ते पाऊले शासनाने उचलावीत अशी विनंती देखील महाराष्ट्र शासनाला या निवेदनाद्वारे मी करीत आहे असे पत्रक नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी प्रसिद्धीला दिली आहे