Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeमराठी बॉलीवुडदिव्यांग मुलांसाठी शिवानी सुर्वे उचलतेय खारीचा वाटा,‘बिगबॉसमराठी’मध्ये घालतेय, त्यांनी डिझाइन केलेले शूज

दिव्यांग मुलांसाठी शिवानी सुर्वे उचलतेय खारीचा वाटा,‘बिगबॉसमराठी’मध्ये घालतेय, त्यांनी डिझाइन केलेले शूज

मल्हार न्यूज, (ऑनलाईन)

‘बिग बॉस मराठी सिझन 2’ मध्ये देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. तिचे स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे. आता अभिनेत्री आहे, म्हटल्यावर कोणत्यातरी महागड्या डिझाइनरकडूनच तिने हे सर्व डिझाइन केलेले असणार , असं अनेकांना वाटतंय. पण शिवानीच्या शूज मागचे शिल्पकार ऐकाल, तर चकित व्हाल.

शिवानीचे शूज डिझाइनर जरूर आहेत. पण कोणत्याही महागड्या डिझाइनरने ते डिझाइन केलेले नसून, ते दिव्यांग मुलांनी डिझाइन केलेले आहेत. फिट मी अप एनजीओच्या मुलांनी डिझाइन केलेले हे शूज शिवानी सध्या घालत आहे. दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ काम करते. ह्या संस्थेचा ‘फिट मी अप’हा दिव्यांग मुलांना रोजगार मिळवण्यासाठी सुरू झालेला इनिशिएटिव्ह आहे.

फिट मी अपची निदेशक, प्रसन्नती अरोरा सांगते, “मी आणि माझी मैत्रिण दिपशिखाने 2011ला दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ची सुरूवात केली. त्यांना सज्ञान झाल्यावर रोजगार मिळावा हे ह्या मागचा उद्देश आहे. आणि आम्हांला आनंद आहे,की, शिवानी सुर्वेसारखे सेलिब्रिटीज आमच्या इनिशिएटिव्हला अशा पध्दतीने पाठिंबा देत आहेत.”

बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर शिवानी सुर्वे ह्यासंदर्भात सांगताना म्हणाली, “जरी ही मुलं दिव्यांग असली तरीही कोणत्याही पारंगत डिझाइनर प्रमाणे त्यांनी शूज डिझाइन केले आहेत. त्यामुळे मी त्यांनी डिझाइन केलेले तीन-चार शूज घेऊन बिगबॉसमध्ये चाललीय. त्यांच्यासाठी माझ्या परीने उचललेला हा खारीचाच वाटा म्हणा ना.” 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!