शिवसेनेच्या वतीने लुल्लानगरपुलाचे उद्घाटन….

1763

तीन राजकीय पक्षांचे उदघाटन ; भाजपाचे उदघाटन बेकायदेशीर;महादेव बाबर

कोंढवा प्रतिनिधी:-

लुल्लानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूलाचे उदघाटन शिवसेनेचे माजी नगरसेवक,मा.आम.महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील व्यक्तीच्या हातून फीत कापून उदघाटन करण्यात आले. दरम्यान भाजपने आयोजित केलेल्या उदघाटन सोहळ्यास पुणे पालिकेची परवानगी नसल्याने ते बेकायदेशीर असल्याचा मोठा आरोप त्यांनी यावेळी केला.  यावेळी नगरसेविका संगीताताई ठोसर, मा.नगरसेवक भरत चौधरी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

‘पुणे तिथे काय उणे’ या उक्ती प्रमाणे असंख्यवेळा पुणेकरांनी खरी करुन दाखवलीय. त्यामुळे आता नव्याने पुण्यात काही कुतुहलजनक घडले, तरी त्यात नाविन्यता काहीच राहत नाही मात्र, सध्याचा प्रसंग या उक्तीला साजेसाच आहे. पुण्यातील कोंढवा भागातील लुल्लानगर येथे बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचं तीन वेगवेगळ्या पक्षांनी तीन वेगवेगळ्या दिवशी तीनवेळा उदघाटन केलं . यातील मनसेच्या वतीने दि.२९ मे पुलाचे उदघाटन करण्यात आले तर शिवसेनेच्या वतीने आज १ जून रोजी उदघाटन करण्यात आले, तर दोन जून रोजी भाजपच्या वतीने खासदार गिरीश बापट, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते आमदार योगेश टिळेकर यांच्या वतीनेहे उदघाटन होणार आहे.  मनसे, शिवेसना,राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील या श्रेयवादाची चर्चा पुण्यासह आता महाराष्ट्रभर रंगते आहे.यावेळी मल्हार न्यूज शी बोलताना महादेव बाबर म्हणाले कि, सन २०११ मध्ये युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर संरक्षण विभागाने या पुलाच्या जागेबाबत हरकत घेतल्याने पुलाचे काम थांबले.दरम्यान शिवसेनेचे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांनी संरक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून याचे ना हरकत प्रमाणपत्र आणून जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली.

दरम्यान आपण यातील महादेव बाबर यांनी जो घटनाक्रम सांगितला आहे तो पाहूयात

  • २००९ मध्ये बाबर नगरसेवक असतना लुल्लानगर येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी पुणे मनपा सभागृहात केली.
  • २०११ मध्ये पुलाच्या कामासाठी पालिकेच्या बजेटमध्ये इस्तीमेट १४.९३ कोटींचे होते ,प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये ५ कोटींची तरतूद बाबर यांनी केली.
  • ९.११.२०१२ रोजी या पुलाची टेंडर प्रक्रिया झाल्यांनतर ठेकेदारास वर्क ऑर्डर देण्यात आली. आणि युवासेनेचे आदित्य ठाकरे याचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष काम सुरु करण्यात आले.
  • संरक्षण विभागाने १४.११.२०११ रोजी या पुलाच्या कामास हरकत घेऊन काम बंद करण्यात आले.
  • यानंतर आमदार बाबर आणि खासदार पाटील यांनी विविध संरक्षण मंत्री व संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून बैठका घेतल्या.
  • पालिकेच्या आयुक्तांशी वारंवार बैठका घेतल्यानंतर आयुक्तांनी ७.०९.२०१३ रोजी स्टेशन कमांडर पुणे सब एरिया यांच्याकडे प्रस्ताव पाठविला.
  • पुणे सब एरिया च्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे न पाठविल्याने अखेरीस आ.बाबर व खासदार आढाळराव पाटील यांनी लोकसभेच्या पिटीशन कमिटीकडे प्रस्ताव पाठविला.
  • लोकसभेच्या पिटीशन कमिटीने तत्कालीन अध्यक्ष अनंतराव गीते यांच्या उपस्थित पाहणी दौरा व सुनावणी घेतली.
  • पिटीशन कमिटीच्या सुनावणी दरम्यान लुल्लानगर येथील उड्डाणपूलाच्या उभारणीस ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे पुणे सब एरियाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले.तसेच सुधारित प्रस्ताव पाठविण्याचा सूचना पुणे मनपास केल्या.
  • बाबर व आढाळराव पाटील यांनी पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे सूचना दिल्या.तर पालिकेने त्वरित सुधारित प्रस्ताव पाठविला.
  • सब एरियाच्या अधिकाऱ्यांनी काही बदल,सूचना केल्याने संरक्षण मंत्री स्व.पर्रीकर यांनी तत्कालीन आमदार महादेव बाबर व आढाळराव पाटील यांच्या भेटी दरम्यान स्वत: पुणे मनपाच्या तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून संयुक्त पाहणी करून प्रस्ताव आठ दिवसात पाठवा असे आदेश दिले.
  • यानंतर आढाळराव पाटील यांनी पुन्हा संरक्षण मंत्र्यांची लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भेट घेतली. त्यानंतर एक महिन्यात ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले.
  • यानंतर बाबर बोलतना म्हणाले पुलाची मागणीही आम्ही केली, भूमिपूजन केले, व आज त्याचे लोकापर्ण हि आम्हीच करणार.

दरम्यान बाबर यांनी आमदार टिळेकर यांच्यावर जोरदार टीका केली. टिळेकर युतीचा धर्म पाळत नसून त्यांनी बनविलेल्या आमंत्रण पत्रिकेत शिवसेनचे धनुष्यबाण आणि त्यांचा फोटो वापरला नसून हि अत्यंत गंभीर बाब असून आपण याची पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करण्याचे सांगितले. आमदार टिळेकर यांनी त्यांच्या विकासनिधीतून एक रुपयाही या पुलास दिलेला नाही, तर ते या पुलाचे श्रेय का घेतात असा प्रश्न देखील उपस्थित केला.

  याप्रंगी शाखाप्रमुख सचिन कापरे, विनोद गव्हाणे, अमर पवळे, ज्ञानेश्वर भोईटे, विजय बधे, शंकर लोणकर, प्रसाद बाबर, महेंद्र भोजने, अंबादास शिंगे, अतुल काटे, प्रवीण ठोसर , गोरख दीक्षित तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.