शैलेंद्र चौधरी नंदुरबार
रमजान महीन्याचे अवचित साधून पत्रकार प्रेरणादायी कट्टा सहानुभूतीची भिंत याठिकाणी जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता संस्कृती कौमी एकता जागृतीसाठी ग्रंथांचे आदान प्रदान हिच काळाची गरज असल्याचे अनुमोदन देवून व प्रत्यक्ष रित्या सहभाग ग्रंथभेट कार्यक्रमासाठी पुढाकार घेत सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रम स्तुत्य उपक्रम असे मत याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांनी मत व्यक्त केले ते म्हणाले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून देशाच्या विकासात त्यांचे भरीव योगदान असल्याचे आढळून आले पत्रकारीता करत असतांनी धार्मिक ग्रंथांचे वाचन इतरांना होवो पत्रकार बांधव कडून राबवित असलेल्या उपक्रमास शुभेच्छा देत पवित्र रमजान पर्वावर मुस्लिम बांधव यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रिसोड तहसीलदार आर.यु. सुरडकर म्हणाले’प्रत्येक माणसाला जात,धर्म,पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा,राष्ट्रीय एकात्मता असतेच ती जागृत करण्याचे काम पोलीस आणि जनता यांनी केले पाहिजे’ त्याकरिता धर्मग्रंथ भेट अशा कार्यक्रमामुळे वाचायला मिळालेले धार्मिक भावना जोपासणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व समाजात घडतील यात तिळमात्र शंकाच नाही .
लोकमतचे तालुका प्रतिनिधी निनाद देशमुख यांनी मत व्यक्त करतांना ते म्हणाले
पोलीस ठाण्यातर्फे जातीय सलोखा अभियान भविष्यात राबविले जावेत याने शांतता मिटींगला उजाळा मिळेल आम्ही सर्वजण विधायक कार्यासाठी हमखास तात्काळ पुढाकार घेवू
रिसोड शहर देशोन्नतीचे प्रतिनिधी गजानन बानोरे यांनी प्रेरणादायी कट्टा सहानुभूतीची यांचा समावेशक प्रास्ताविक अप्रतिम केले व सगळ्यांना बोलते केले ते अधिक बोलताना म्हणाले काळाची गरज काय नाही?पर्यावरण काळजी गरज लोकसंख्या नियंत्रण काळाची गरज,भ्रष्टाचार निर्मुलन काळाची गरज पण त्यातल्या त्यात जातीय सलोखा हि तर जास्त काळाची गरज आहे भारतात अनेक जाती,पंथ,धर्म गुण्यागोविंदाने नांदतात परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना हि शांतता बघवत नाही असे मत याप्रसंगी बानोरे सरजी यांनी व्यक्त केले व सर्व उपस्थित यांचे मत जाणून घ्यायला महत्त्वाची भुमिका बजावली याप्रसंग रिसोड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष निरीक्षक आनिल ठाकरे यांनी वरीष्ठ अधीकारी यांच्या विचारांना अनुमोदन दिले लोकमतचे विशेष प्रतिनिधी शितल धांडे यांनी उपस्थित पाहुण्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात विषेश योगदान दिले व जबरदस्त आभार व्यक्त करीत आपले विचार व्यक्त पुढीलप्रमाणे केले माणुसच माणसाला खायला निघाला अरे माणसा तुला मन, बुद्धी,वाचा सर्व काही सरस दिले आहे मग त्याचा उपयोग कसा करावा”अरे माणसा माणसा कधी होशील माणुस”जगाच्या पाठीवर असा एकच देश आहे, कि तेथे अनेक संप्रदायांचा उगम झाला आहे म्हणजे सर्वात जास्त अध्यात्मियतेचे पिक आहे निर्माण झालेली एकसंघता पण ती गळुन पडली आहे लोकांची माने दुभंगली,ती पुन्हा जोडण्याचे काम अतिशय त्रासाचे झाले आहे . एकमेकांतील वैमनस्य विकोपाला जात आहे अशा भांडणांना आम्ही बळी का पडतो?अशांतता निर्माण समजले पाहिजे कि कितीतरी सुशिक्षित बेकार आहेत त्यांचा पोट भरण्याचा प्रश्न न बघता आमच्या या युवाशक्तीचा असा वापर करून घेत आहेत त्यामुळे तरुणांची माने स्थिर राहिली नाहीत जुने लोक म्हणतात, ”आतेनी कलीच बदली गयी”ते खरेच आहे कारण”येल काकडीचा लावला बहार कारल्याचा आला”वेळेची गरज समजुन धार्मिक ग्रंथांचे आदान प्रदान करण्यात आले आहे याही पुढे जाऊन म्हणाले नजीर काझी व त्यांच्या सहकाऱ्यांच कौतुक केले पत्रकार शेख अन्सार यांचेकडून विषेश सहकार्य लाभले उपस्थितीमधे तंटामुक्त समितीचे सदस्य,पोलीस पाटील,पोलीस क्रमचारी,विजय देशमुख सूत्रसंचालक,पत्रकार बांधव शांतता समिती सधेश मुस्लिम बांधव न.प क्रमचारी यांच्या समावेश होता.