राज्य परिवहन मंडळाच्या वाहतूक नियंत्रकास 8000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले

1278

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या  आगारात वाहतूक नियंत्रक म्हणुन कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत तक्रारदार एस टी चालकाकडून त्याच्या हक्काची एक दिवसाची रजा मंजूर असतांना  त्याचे वरिष्ठ अधिकारी वाहतूक नियंत्रक नंदकिशोर वसंत शेवाळे एस टी डेपो नंदुरबार रा.वाघेश्वरी मंदिराजवळ विमल हौसिंग सोसायटी,नंदूरबार यांनी त्याचे निलंबन टाळण्यासाठी 10000 हजार रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडीअंती 8000 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार आज दुपारी चार वाजेच्या सुमारास नंदुरबार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक करूननाशील तायडे , शिरीष जाधव पोलीस उप-अधीक्षक  यांच्या पथकाने सापळा रचून नियंत्रक नंदकिशोर वसंत शेवाळे  यांना रंगेहात  पकडण्यात आले.

याबाबत अधिक माहिती देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चालक या पदावर काम करतात त्यांनी 20 वर्ष सेवा केली आहे. 19 में रोजी त्यांची एक दिवसाची किरकोळ रजा मंजूर असताना वसंत शेवाळे यांनी तक्रारदार एस टी चालक यांना तुम्ही गैरहजर आहात तुम्हाला निलंबीत करतो निलंबन टाळायचे असेल तर रुपये 10,000 द्यावे लागतील असे सांगून तडजोडी अंती एस टी चालक यांचेकडे शेवाळे यांनी 8,000/₹ लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम नंदूरबार एस.टी डेपो जवळ स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे