दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन व्हावे

811

पर्यावरण दिनानिमित्त टेकडीवर वृक्षारोपण

पुणे (प्रतिनिधी)
बेसुमार वृक्षतोड होत असल्याने निसर्गाची हानी होत आहे पर्यायाने महाराष्ट्राला प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागत आहे आगामी काळात परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड व संगोपन करावे असे आवाहन ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी केले.
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन पुणे महानगर व आर. व्ही. सहज चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड, पौड रोड येथील ए.आर.आय च्या वनीकरण जागेत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्ताने पर्यावरण वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा असे आवाहन करण्यात आले.
नगरसेविका छाया मारणे, आरपीआयचे राष्ट्रीय निमंत्रक एडव्होकेट मंदार जोशी, वृक्ष संवर्धन समिती सदस्य महेश पवार, आर.व्ही. सहज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल व्यवहारे, असोसिएशनचे कार्याध्यक्ष समीर देसाई, संपर्कप्रमुख सागर बोदगिरे, दीपक पाटील, अमित कुचेकर, धनराज गरड,जगदीश कुंभार, विशाल भालेराव,
सहाएक उद्यान अधीक्षक जी.आर.तुमाले, वृक्ष निरीक्षक अनिल साबळे, अजय मारणे, डॉ.संदीप बुटाला, पत्रकार जुतेंद्र मैड, यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाश्चिमात्य देश निसर्गाबाबत अतिशय जागृत आहेत, त्यामुळे तेथील आयुष्यमान चांगले आहे, भारतात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन व्हावे आणि निसर्गाची होणारी हानी टाळावी असे आवाहन एडव्होकेत मंदार जोशी यांनी यावेळी बोलताना केले.
झाडे लावा झाडे जगवा, निसर्गाचे जतन करा असे आवाहन यावेळी नगरसेविका छाया मारणे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन व आर.व्ही.सहज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.