परवाना नसलेले कपाशीचे बियाणे जप्त

1885

शैलेंद्र चौधरी नंदूरबार
13 जून रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास बस स्टॅंडवर विदेशी भारतीय विक्रीस परवाना नसलेले कपाशीचेHTBT COTTONची300पाकीट , प्रति पाकीट 730 रुपये किंमतीचे रिक्षा मधुन वाहतुक करताना नंदुरबार जिल्हा कृषी अधिकारी व त्यांच्या पथकास आढळून आल्याने त्यांनी तात्काळ चौकशी करून खात्री झाल्यावर ताब्यात घेण्यात येऊन पुढिल कायदेशीर कार्यवाहीसाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही जिल्हा कृषीअधिकारी डाॅ.बी.एन पाटील,रामोळे तालुका कृषीअधिकारी नरेंद्र महाले जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे पंचायत समिती कृषी अधिकारी योगेश हिवराळे यानी केली फौजदारी गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे नंदुरबार बस स्टॅंड मधे सदरची कार्यवाही करण्यात आली