Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeमुंबई/कोंकणरायगडतुळजाभवानी ज्योत किल्ले रायगडावर पोहचणार

तुळजाभवानी ज्योत किल्ले रायगडावर पोहचणार

महाड , जुनेद तांबोळी  प्रतिनिधी

जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता दरवर्षी प्रमाणे सोलापूर येथील रायगड प्रतिष्ठानचे शंभरहून अधिक मावळे येत असतात. तुळजाभवानी ज्योत घेऊन येणारे मावळे आज दि. 14 जून रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी येऊन थडकणार असल्याची माहिती  तुळजाभवानी ज्योतीचे प्रमुख शिवाजी भोसले यांनी दूरध्वनीवरून दिली.

       शिवराज्याभिषेक समिती आणि कोकण कडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगडावर होणाऱ्या 346 व्या शिवराज्याभिषेक दिनासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवप्रेमी मंडळ येत असतात. दरवर्षी प्रमाणे सोलापूर येथील रायगड प्रतिष्ठानचे शिवप्रेमी यंदाही किल्ले रायगडावर या सोहळ्यासाठी येत आहेत. दि. 11 जून रोजी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन तिथे मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत करून सोलापूर येथे रवाना झाले. त्यानंतर सोलापूरहून सर्व शिवभक्त किल्ले रायगडाकडे निघाले असूव दि. 14 जून रोजी सकाळी महाड येथे येणार आहेत. शिवाजी चौक येथे या ज्योतीचे स्वागत झाल्यानंतर हे सर्व शिवभक्त किल्ले रायगडाच्या दिशेने वाजत गाजत निघणार आहेत. पाचाड येथे वस्ती केल्यानंतर दि. 15 जून रोजी पहाटे किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होतील. 

      शिवभक्तीचा प्रचंड उत्साह घेऊन नैसर्गिक परिस्थितीचा सामना करीत हजारो मावळे किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी येतात ते जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगडचे धारकरी म्हणूनच असे मत यावेळी सोलापुरचे शिवाजी भोसले यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!