शशीकांत दळवी, पनवेल प्रतिनिधी
नविन पनवेल सेक्टर ९ मध्ये D A V शाळेच्या ३ नंबर गेटच्या समोरील गल्लीत गेले दोन अडीच महिने झाले तरी रस्त्याचे काम चालु आहे. अजुन पर्यत हे काम पुर्ण होत नाही हे शाळेच्या गेट समोर चालू असल्याने येथुन शाळेतुन ये जा करण्यासाठी मुले ह्या गेटचा वापर करतात. रस्ता खोदुन ठेवल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.शाळेच्या गाड्यामधुन मुले ने आण करण्यासाठी मुलांना शाळेच्या गेट पर्यत पोहचविण्यासाठी हाच रस्ता असल्याने नेहमी ट्रॉफीक ची समस्या होत आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी वेळेवर पोहचता येत नाही आता पावसाळा सुरु झाल्यामुले अजुन ही ट्रॉफीक ची समस्या वाढणार आहे. म्हणुन या रस्त्याचे काम लवकरात लवकर लक्ष घालुन काम त्वरित पूर्ण करावे नाहीतर समस्या वाढत जाईल अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.