जामतलाव येथून बेकायदेशिररित्या साग व खैर जातीचे 3लाख 50हजाराचे लाकूड जप्त

881

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जामतलाव येथून बेकायदेशिररित्या साग व खैर जातीचे 3लाख 50हजाराचे लाकूड जप्त करण्यात आले आहे.

याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  20 जून रोजी सकाळी पहाटे 4 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने नवापुर तालुक्यातील जामतलाव यागावी साग व खैर या लाकडाची अवैध वाहतूक करणारे टाटा सुमो वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून जप्त केला व त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे बाजार भाव मूल्य किंमत 3.50 लाख रुपये आहे. सदर कार्यवाही सहायक वनसंरक्षक नंदुरबार गणेश रणदिवे,वनक्षेत्रपाल नवापूर आर बी पवार,वनपाल वडकळंबी डि के जाधव,वनपाल खेकडा पी व्ही मावची, वनरक्षक माजी सैनिक वाहनचालक यांनी कार्यवाही केली सदर घटनेबाबत वनपाल वडकळंबी यांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे