Sunday, December 7, 2025
Google search engine
Homeमराठी बॉलीवुडअभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशुट

अभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशुट

चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबेने नुकतंच स्टनिंग फोटोशुट केलंय. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या प्रकारच्या  स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणा-या सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय. 
फोटोशूटवेळी स्मिता तांबे म्हणाली, “मी गेल्या दहा-बारा वर्षात अशा पध्दतीने स्वत:चे वेगळे फोटोशूट केले नाही. ज्या-ज्या भूमिका रंगवत गेले त्या-त्यावेळी सिनेमातल्या भूमिकेनूसार, पोस्टरसाठीच केवळ फोटो काढले आहेत.. हयाशिवाय मी कधी ग्लॅमरस भूमिका न रंगवल्याने माझे कधी ग्लॅमरस फोटोसेशन माझ्या चाहत्यांसमोर आले नव्हते.”
स्मिता तांबेच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात  2019 मध्ये अनेक नव्या गोष्टी घडतायत. त्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, “हो, यंदा वर्षाच्या सुरूवातीला माझं लग्न झाले. आणि त्यानंतर आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडले. मी व्यावसायिक रंगभूमीवर खूप वर्षांनी इडियट्स नाटकाव्दारे परतले. सावट सिनेमाव्दारे निर्मितीक्षेत्रात पाउल ठेवले. डिजीटल विश्वातही पदार्पण झाले. आणि आता माझ्या एका मागोमाग एक तीन वेबसीरीज येतायत. त्यात बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतही खूप चांगले प्रोजक्ट्स करतेय, ज्यांची लवकरच अनाउन्समेंटही होईल.” 
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!