महामानवांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी- जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे

1006

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समतेची शिकवण दिली आहे.अशा महामानवांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले.जुने पोलीस कवायत मैदान येथे समता दिनानिमित्त आयोजित ते बोलत होते.या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील,अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव भवाने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सारीका बारी,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी,समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राकेश महाजन आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले,छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज घडविण्यामध्ये मोठे योगदान आहे.या महापुरुषांचे विचार अनुसरल्यास आदर्श समाज घडविता येईल.
संजय पाटील म्हणाले,राजर्षी शाहू महाराजांनी उपेक्षित घटकांना विकासाचा मार्ग दाखविली असून तळागातील लोकांच्या उध्दारासाठी,विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठे प्रयत्न केलेत.समान्यजनांच्या शिक्षणासाठी आवश्यक नियोजन महाराजांनी त्या काळात करुन ठेवले आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात झाले.तसेच जिल्हाधिकारी व उपस्थितांच्या हस्ते इयत्ता 10 वी व 12 वीत शाळेत प्रथम द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे व उपस्थित अधिकारी यांनी समता दिंडीस हिरवी झेंडी दाखवून समता दिंडींचा शुभारंभ केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी केले.
0 0 0 0 0 0 0 0 0 0 0

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

जिल्हाधिकारी कार्यालयात आज अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम,सुधीर खांदे,नायब तहसिलदार आशा सोनवणे आदी उपस्थित होते.
0 0 0 0 0 0 0 0 0 0 0

1 जुलै रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी,अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर, विभागीय स्तरावर, लमंत्रालय स्तरावर आयोजित करण्यात येतो. जिल्ह्याचा लोकशाही दिन जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार माहे जुलै 2019 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 1 जुलै 2019 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृह,येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0 0

दि 26 जून, 2019
निवृत्तीवेतन 5 जुलै पर्यंत बँक खात्यात जमा होणार

जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतन/कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचे माहे जून 2019 महिन्याचे निवृत्तीवेतनात सातव्या वेतन आयोगानुसार लाभधारकास मिळणाऱ्या फरकाचा पहिला हप्ता देण्याचे काम प्रगतीपथावर असल्याने जून 2019 चे निवृत्तीवेतन 5 जुलै 2019 पर्यंत बँकेत पाठविण्यात येईल.याची सर्व निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी,असे जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप यांनी कळविले आहे..

*स्वतंत्र पर्यावरण सनियंत्रण दलाची बैठक संपन्न*

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ धुळे यांच्यामार्फत स्वतंत्र पर्यावरण सनियंत्रण दलाची प्रथम बैठक जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.या बैठकीस जिल्हा न्यायाधीश,जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, प्रादेशिक अधिकारी म.प्र.नि. मंडळ,नाशिक त्यांचे प्रतिनिधी तसेच विशेष आंमत्रित सदस्य म्हणून मुख्याधिकारी तळोदा नगरपरिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी मुख्याधिकारी,नगरपरिषदा यांनी बंदीस्त गटारीव्दारे गावातून निघणारे घरगुती सांडपाणी एकत्रितरीत्या जमा करून त्यावर घरगुती सांडपाणी प्रक्रीया केंद्रे उभारून लवकरात लवकर कार्यान्वीत करावे,अशा सुचना दिल्या.प्रदुषित नद्यांच्या पट्यातील प्रदूषण कमी करण्याकरीता संबंधीत नगरपरिषदा,ग्रामपंचायत यांनी कृती आराखडा दोन महिन्याच्या आत तयार करावा.कृती आराखडा तयार करतांना प्रदूषणाचे घटक निश्चित करणे यामध्ये STP/ETP ची सद्यस्थिती घनकचरा व्यवस्थापन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची Quantity, त्यावरील प्रक्रिया,घनकचऱ्याची गुणवत्ता,प्रदूषित पट्टयांमध्ये निर्माण होणारे सांडपाणी या सर्व बाबींचा समावेश करण्यात यावा.तसेच नदी प्रदूषित पट्यांमध्ये उत्खनन होणार नाही याची संबंधीत विभागाने खबरदारी घ्यावी,असे त्यांनी सांगितले.