भारतातील युनिसेफ प्रमुखांची नंदुरबार जिल्ह्याला भेट

655

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

युनिसेफच्या भारतातील प्रमुख डॉ.यास्मिन अली हक यांनी जिल्ह्यास नुकतीच भेट दिली त्यांच्यासमवेत युनिसेफच्या क्षेत्रीय अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर आणि पोषण आहारतज्ज्ञ राजी नायर होत्या.
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी त्यांचे स्वागत करून प्रशासनातर्फे नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा व पोषण विषयक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.एल.बावा आदी उपस्थित होते.
युनिसेफद्वारा आकांक्षित जिल्ह्यातील अपेक्षित निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे याबाबत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी श्रीमती हक यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत युनिसेफच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या ‘अमृतमंथन’ कार्यशाळेत निश्चित करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार पुढील उपाययोजनांसाठी युनिसेफतर्फे सहकार्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन डॉ.हक यांनी दिले.
बालाजी मंजुळे म्हणाले
,नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनतेत शिक्षणाचा प्रसार विशेषत: मुलींच्या शिक्षणावर जास्त भर देण्यात यावा जर मुलगी शिकली तर तिच्या कमी वयात विवाह होणार नाही,सहाजिकचं विवाहाचे वय वाढेल मुलगी शिकली तर तिच्या शारिरीक व मानसिक विकास होईल एकंदरीतचं जन्मणारी पिढी कुपोषित जन्मणार नाही. युनिसेफ व इतर संस्थांनी या संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले रणधीर सोमवंशी यांनी अमृतमंथन कार्यशाळेतील निर्देशांकावर विशेष भर देण्यात यावा,असे सांगितले डॉ.यास्मिन अली हक यांनी धडगांव तालुक्यातील उर्मिमाल या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन तेथील किशोरवयीन मुली,माता आणि बालकांशी संवाद साधला. पोषण पुनर्वसन केंद्र धडगांव येथे भेट देऊन दाखल बालके आणि पालकांशी चर्चा केली. तालुकास्तरावर सुरु केलेल्या ‘आयर्न सुक्रोज’वार्डात दाखल तीव्र रक्तक्षय असणाऱ्या महिलांशी आणि अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्ती व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासोबत चर्चा करुन जिल्ह्यातील माता व बाल आरोग्यसंदर्भात चर्चा केली.
युनिसेफ मार्फत जिल्ह्यात सन 2005 पासून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यात प्रामुख्याने ‘सीमॅम’(Community Based management of Acute Malnutrition) प्रकल्प,स्तनपान व शिशुपोषण कार्यक्रम,पोषण पुर्नवसन केंद्र, आयएमएनसीआय क्षमता बांधणी प्रशिक्षण,बाळाचे पहिले 1000 दिवस या विषयावर ग्रामस्तरावरी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण,अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात पोषण परसबागेद्वारे दैनंदिन आहार सेवनांमध्ये हिरव्या पाल्या भाज्याचे प्रमाणात वाढ करणे इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत या उपक्रमांची डॉ.यास्मिन अली हक यांनी पाहणी केली.