मराठा आरक्षणामुळे नंदुरबारला क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे आनंदोत्सव

563

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार-मराठा समाजाला दिलेले शिक्षणात १२ टक्के तर नोकरीत १३ टक्के आरक्षण दिल्याने येथील क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे आनंदोत्सव साजरा केला यावेळी जुनी नगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन तसेच मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्व जणांना स्मरुन,तसेच आरक्षणाच्या लढ्यात सहभागी असलेल्या समाज बांधवांना शुभेच्छा देवून आनंद व्यक्त केला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी क्षत्रिय मराठा युवा सेनेचे अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांनी सांगितले की,अनेक वर्षांचा लढा आज पूर्ण झाला. मुकमोर्चाचा आवाज विधानसभेच्या पटलापासून तर न्यायालयापर्यंत दिसून आला. यापूर्वी इतर पक्षांनी देखील आरक्षणाचा मसुदा तयार केला. मात्र तांत्रिक अडचणींमुळे फेटाळण्यात आला ती चूक लक्षात घेता सर्व पक्षाच्या लोकांनी या मागणीला पाठींबा देवून एकमत केले व अहवालात योग्य मसुदा तयार केल्याने आज त्याचा विजय झाला एकमुठ बांधण्यासाठी विनोद पाटील व त्यांच्या सहकार्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना भाग पाडले व मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेवून मराठा समाजाला खर्‍या अर्थाने न्याय दिला म्हणून शासनाचे आभार मानण्यात आले.यावेळी लल्ला पहेलवान,दादू मराठे, यशराज मराठे,राहुल मराठे, दिपक मराठे,आतिष मराठे, राजा मराठे,कृष्णा मराठे,बंटी मराठे,आकाश मराठे,गोविंदा मराठे,चेतन मराठे,राहुल पुष्पेंद्र मराठे तेजस मराठे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते