मल्लिनाथ गुरवे,
स्माईल फौंडेशन ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून ती भारतातील सर्व राज्यामध्ये मोफत आरोग्य सेवा देण्याचे काम करते .
संस्थेने मागील वर्षात जवळपास 16000 व्यक्तींना आरोग्य सेवा दिली
दिनांक 27 जून 2019 रोजी स्माईल फाउंडेशन आणि नागर वस्ती विभाग पुणे मनपा आणि जाणीव सामाजिक संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामोशी गेट पुणे येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये 350 वारकऱ्यांचे मोफत आरोग्य तपासणी मोफत औषध उपचार केली आहे.
या आरोग्य तपासणी शिबिरास मा. श्री रमेशदादा बागवे, माजी राज्यमंत्री , संजय कोळपे रामदास धावडे समाज विकास विभाग, स्माईल फौंडेशनच्या रेखा आनंद, डॉ. सुभाष गायकवाड, सांची गजधाने, शलाका पाठक, खंडू बनसोडे, बाळकृष्ण वाळुंजकर प्रतिष्ठान चे घनश्याम वाळुंजकर, जय महाराष्ट्र प्रतिष्ठान चे तिळवण तेली , साईनाथ बाबर, जाणीव सामाजिक संस्थेचे डॉ. जाधव, डॉ. मेनका चांगले, डॉ. शाहरुख शेख, डॉ. प्रमिला जंगम व भैरवनाथ तालीम मंडळाचे श्री गणेश लोणकर, यांनी शिबीर यशस्वी करण्यास विशेष मेहनत घेतली आहे. या शिबिराकरिता श्रीमती रेखा आनंद, समनव्यक, स्माईल फाउंडेशन व टीम आणि श्री रामदास धावडे समाजसेवक, जयश्री शिंदे नागरवस्ती विकास विभाग मनपा पुणे यांनी विशेष प्रयत्न केले आहे.