पुण्यातील पहिले ‘ब्युटी हेअर एज्युकेशनल’ एक्स्पो 15-16जुलैला

546

करियर घडवण्याची सुवर्णसंधी सहभागी युवतींना मोफत मार्गदर्शन

सागर बोदगिरे, पुणे :

सध्याचे युग आहे ते ग्लॅमर आणि सुंदर दिसण्याचे! आजच्या स्पर्धेच्या युगात तर व्यक्तिमत्त्वाच्या सादरीकरणालाही अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे. याची जाणीव तरुण मुलींमध्ये वाढती असून त्या निमित्ताने भारतातील पहिल्या वहिल्या ब्युटी हेअर एज्युकेशनल एक्स्पो 2019 चे आयोजन पुण्यात दिनांक 15 व 16 जुलै रोजी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या एक्स्पोमध्ये सहभागी होणा­या युवतींना अनेक विषयांतील मार्गदर्शन मोफत मिळणार आहे.
ब्युटी हेअर एज्युकेशनल एक्स्पो 2019 पुण्यातील बालेवाडी येथील बंटारा भवनच्या शानदार सभागृहात दोन दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. स्त्री सौंदर्य आणि मेकअप या क्षेत्रातील अनेकानेक नामांकीत कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी या एक्स्पोमध्ये आवर्जून सहभागी होणार आहेत. सहभागी सर्वांना या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण असे जागतिक ट्रेंड्स आणि व्यवसायाच्या नव्या संधी याची माहिती मिळू शकणार आहे.
मेकअप या सौंदर्यशास्त्राचा संपूर्ण इतिहास, बॉलीवूड नववधूचा मेकअप, लांबसडक केसांचे सौंदर्य, एडिटोरियल अँड फँटसी मेकअप, ब्राायडल फॅशन, रॉयल मराठा ब्रााईड, सात प्रकारचे कलर हेअर कट आदी विविध विषयांवर प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन यात असेल. त्याशिवाय, रँप वॉक, प्रेरणादायी ब्युटी टॉक अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचाही त्यात समावेश असणार आहे.
”आगामी काळात मेकअप क्षेत्रात स्वत:ची कारकीर्द घडवू इच्छिणा­यांसाठी ही अतिशय चांगली सुवर्णसंधी आहे. या निमित्ताने ब्युटी हेअर एज्युकेशनल एक्स्पो 2019च्या एकाच छताखाली सर्व प्रकारचे या क्षेत्राशी संबंधित लोक एकत्र येणार आहेत आणि त्यांचे उत्तम व दिशादर्शक मार्गदर्शन मिळू शकणार आहे. प्रात्यक्षिके आणि नव्या पर्यायांची संधीही येथे प्राप्त होणार आहे. तेव्हा मोठ्या संख्येने इच्छुक युवतींनी यामध्ये सहभागी व्हावे व त्याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
या एक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्य समन्वयक रेखा अगरवाल यांच्याशी 9137940065 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.