ज्येष्ठ नागरीकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव वाटप

894

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली,अलिम्को कानपूर,जिल्हा प्रशासन नंदुरबार,महात्मा गांधी सेवा संघ आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 60 वर्षांपुढील गरजू ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या वयोश्री योजनेअंतर्गत आवश्यकतेनुसार लागणाऱ्या कृत्रिम अवयव व साधने मोफत वाटप करण्यासाठी 22 ते 26 जुलै 2019 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नाव नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे या तपासणी शिबीरामध्ये व्हिल चेअर,श्रवणयंत्र,कुबडी,स्टिक, कमोड चेअर,वॉकर,एल्बो क्रचेस,क्रचेस, एल.एस.बेल्ट, नीकॅप,सर्व्हाकिल कॉलर, वॉकिंग स्टिक, अंधचष्मा, अंधकाठी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे सोमवार
22 जुलै 2019 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार,
मंगळवार 23 जुलै ग्रामीण रुग्णालय नवापूर,24 जुलै ग्रामीण रुग्णालय मसावद ता.शहादा,25 जुलै उपजिल्हा सामान्य रुग्णालय तळोदा,26 जुलै ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा आणि 27 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय अक्राणी येथे नावनोंदणी करण्यात येणार आहे गरजू ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान नाव नोंदणीसाठी उपस्थित रहावे. सोबत आधारकार्ड,दोन पासपोर्ट आकाराचे फोटो,ज्येष्ठ नागरीक बीपीएल पेन्शन कार्ड आणि शासकीय डॉक्टरांनी प्रमाणित केलेले ज्येष्ठ नागरीकांचे प्रमाणपत्र सोबत आणावेत या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0 आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी-जिल्हाधिकारी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्तीव्यवस्थापन
यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहून जीवित किंवा वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आपत्ती निवाराणार्थ पावसाळ्यात करावयाचे उपाययोजना संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी कार्यकारी अभियंता अनिल पवार,वर्षा अहिरे,रवींद्र मोरे, पी.टी.बडगुजर,एस.सी.
ठवरे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी व्ही.व्ही.बोरसे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बालाजी मंजुळे म्हणाले,
पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी वरखेडी नदीवर अक्कलकुवा गावातुन जाणाऱ्या पुलाजवळील अतिक्रमण काढावे व धोकादायक पुलाबाबत तात्काळ
उपाययोजना करण्यात याव्यात. दुर्घटना झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. पावसात वीज वाहिनी नादुरुस्त झाल्यास महावितरणने 24 तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. लघुपाटबंधारे विभागाच्या प्रत्येक प्रकल्पावर भेट देवून धोकादायक बाबी निदर्शनास आल्यास तातडीने दुरस्ती करावी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तात्पुरत्या योजनांची पाहणी करुन तात्काळ अहवाल सादर करावा गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता सर्व विभागांनी आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
लघुपाटबंधारे विभागाचे 186 पाझर तलाव व 219 गावतलाव आहेत याची पाहणी करण्यात आली असून सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक उपायोजना केली असल्याचे श्री.मोरे यांनी सांगितले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत येणारे रस्ते व पुलावर कुठेही समस्या नसल्याचे उपअभियंता आर.व्ही.जामनेकर यांनी सांगितले नवापुर शहरातुन जाणारा ब्रिटीश कालीन पुल सां.बा. विभागाकडुन नवापुर नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला असून अवजड वाहनांना या पुलावरुन वापरास बंदी करण्यात आली असल्याचा फलक लावण्यात आले असून दोन्ही बाजूस स्ट्रकल बॅरिकेटस देखील लवकर लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले तळोदा मुख्याधिकारी यांनी आपत्कालीन सर्व यंत्रणा सतर्क असून आवश्यक साधन साहित्य तयार असल्याचे सांगितले.