Homeबॉलिवूडस्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मध्ये लग्नाचा सीन साठी घेतली बिपाशा बसू ची...

स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मध्ये लग्नाचा सीन साठी घेतली बिपाशा बसू ची मदत  

मल्हार न्यूज,पुणे
 

विवाहातील तपशिलासाठी बिपाशा बसूकडे विचारणा! स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत लवकरच एक बंगाली पध्दतीचा विवाह पार पडणार असून त्यातीलविधी आणि परंपरांच्या माहितीसाठी मादक सौंदर्यवती अभिनेत्री बिपाशा बसूकडे विचारणा करण्यात आली आहे.

बिपाशाचा पती करणसिंह ग्रोव्हर हा या मालिकेत श्री. बजाज ही खलनायकाची भूमिका साकारीत आहे. या दोघांचा विवाहसुध्दा बंगाली पध्दतीने पार पडला होता. बिपाशा स्वत: बंगालीभाषिक असल्याने बंगाली पध्दतीच्या विवाहातील
विधी, परंपरा यांची माहिती घेण्यासाठी तिच्यासारखी दुसरी कोण असणार!
मालिकेची नायिका प्रेरणाचा विवाह होणार असल्याची कल्पना प्रेक्षकांना आहे. या मालिकेच्या प्रसारणास प्रारंभ
झाल्यापासून प्रेरणाचा विवाह कधी होतो, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. त्यामुळे आता या विवाहाचेचित्रीकरण करताना निर्मात्यांनी बिपशाला आपल्या लग्नाच्या अल्बमचा आधार घेऊन त्यातील प्रत्येक विधी आणि रूढीयांची माहिती देण्याची विनंती केली आहे. लग्नासारखे प्रसंग हे वास्तवातील विवाहांप्रमाणेच आणि मूळ रीतिरिवाजांनुसारच होत आहेत की नाहीत, याकडे प्रेक्षकांचे बारीक लक्ष असते.
सध्या सुरू असलेली ‘कसौटी झिंदगी के’ ही मालिका मूळ मालिकेचाच पुढील भाग आहे. मूळ मालिकेला देशभरातीलप्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम लाभले होते. आता तब्बल 18 वर्षांनी ‘कसौटी झिंदगी के’चा हा पुढील भागप्रसारित होत असून ‘स्टार प्लस’वरून सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 वाजता या मालिकेचे प्रसारण केले जाते.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

rouspolisthis1975 on Home
conchybason1979 on Home