Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेकचरा व सांडपाणी प्रकल्पासाठी तात्काळ शासकीय जागा देऊ- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

कचरा व सांडपाणी प्रकल्पासाठी तात्काळ शासकीय जागा देऊ- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

वाघोलीतील समस्यांबात ग्रामपंचायत कार्यालयात घेतली बैठक

मल्हार न्यूज,पुणे 

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या वाघोलीला भेडसावणाऱ्या कचरा व सांडपाणी प्रकल्पांचे अहवाल आल्यानंतर तात्काळ शासकीय जागा देण्याची कार्यवाही केली जाईल असे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. वाघोलीतील समस्यांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक समस्या, नैसर्गिक प्रवाह व ओढे-नाले बुजविणे बाबत व गृह प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.

वाघोलीमध्ये अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी व कचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी वाघोली ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी देखील जिल्हाधिकारी राम यांना वाघोलीमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी वाघोली येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी, आमदार बाबूराव पाचर्णे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक संदीप येळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते, पीएमआरडीएचे अधिकारी, ग्रामंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व सांडपाणी प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेबाबत बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, वाघोली ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासकीय जागेमध्ये कचरा प्रक्रिया व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करण्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ जागा उपलब्ध करून दिली जाईल. याबाबत गट विकास अधिकारी यांना प्रकल्प अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले. सध्याची व भविष्याची गरज लक्षात घेता विस्तृत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागार घेण्यासाठी देखील मदत केली जाईल. कचरा समस्या सुटेपर्यंत ग्रामपंचायतीने जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
वाघोलीसाठी पीएमआरडीए करीत असलेल्या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
खांदवेनगर येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून खांदवेनगर येथील रस्ता दुभाजक बंद करण्याबाबत चर्चा करून कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. एक महिन्यामध्ये पुणे-नगर महामार्गावरील सर्वाधिक तक्रारी असणारे वाघेश्वर चौक ते श्रेयस गार्डन पर्यंतचे कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बांधकाम व्यावसायिकांनी बुजविलेल्या नैसर्गिक ओढे-नाल्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी व गृहप्रकल्पांच्या समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीए आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा करून धोकादायक बांधकामे थांबविण्यासाठी चर्चा केली जाईल, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!