मालिकेच्या शिर्षकामध्येच खूप काही दडलेलं आहे – आदेश बांदेकर

651

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी सोहं प्रोडक्शन्सच्या माध्यमातून दर्जेदार मालिकांची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रॉडक्शनची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद

सोहम प्रोडक्शन्सची अजून एक नवीन मालिका झी युवा वाहिनीवर येत आहेत्याबद्दल काय सांगाल?

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ नावाची ही नवीन मालिका सोहम प्रोडक्शन्स घेऊन येत आहे. १५ जुलैपासून रात्री ८ वाजता ही मालिका ‘झी युवा’वर पाहता येईल. आजपर्यंत सोहम प्रोडक्शन्सच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात विविधप्रकारेकाम केले आहे. हा याच प्रवासाचा पुढचा टप्पा आहे असं म्हणता येईल. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. आजवर जसं समर्थन मिळत राहिलंय, तसंच यापुढेही मिळत राहील याची आम्हाला खात्रीआहे.

. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण‘ ही मालिका नावाप्रमाणेच अनोखी आहेमालिकेविषयी थोडक्यात सांगा.

मालिकेच्या शिर्षकामध्येच खूप काही दडलेलं आहे. तरीही सांगायचं झालं तर, मराठी संस्कृतीचा अभिमान असलेलं एक कुटुंब या मालिकेत तुम्ही पाहणार आहात. परदेशात राहणाऱ्या एका मुलाचा जेव्हा या कुटुंबाशी संबंध येतो,त्यानंतर घडणारी आणि दोन तरुण जीवांची अशी ही एक प्रेमकहाणी आहे. आपली संस्कृती टिकवण्याचा कुटुंबप्रामुखाचा अट्टाहास आणि त्यातून इतरांची उडणारी तारांबळ, ही या मालिकेतील खरी गम्मत असेल. ही मालिका प्रत्येकप्रेक्षकाला कायम आपलीशी वाटत राहील याचं मी आश्वासन देतो.

मराठीवर इंग्रजी भाषेचं वर्चस्व होतंय असं तुम्हाला वाटतं का?

नक्कीच असं घडतंय. आपण मराठीत बोलत असतानाही, अनेक मराठी शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द अगदी सर्रास वापरात असतो. अनेकदा या शब्दांसाठी असलेले मूळ मराठी शब्द आपल्याला आठवत सुद्धा नाहीत. या मालिकेच्यामाध्यमातून आमचा हाच प्रयत्न असणार आहे.  इंग्रजी शब्द न वापरता, पूर्णपणे मराठीत बोलायचा तुम्ही प्रयत्न केलात आणि इंग्रजीचं मराठीवर होत असलेलं अतिक्रमण कमी झालं; तर ते या मालिकेचं खरं यश असेल. मनोरंजनकरतानाच ही मालिका, मराठीवर इंग्रजीचं वर्चस्व कशाप्रकारे आहे, हेदेखील तुम्हाला दर्शवून देईल.

४. प्रेक्षकांना काय आवाहन कराल?

प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद यांची नितांत आवश्यकता आहेच. निखळ मनोरंजन करणारी अशी ही मालिका असणार आहे. त्यामुळे दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी आणि निखळ आनंदाचा लाभ घेण्यासाठी ही मालिका नक्कीपहा. ‘झी युवा’ या वाहिनीवर एक युवा निर्माता आणि अभिनय क्षेत्रात एक युवा जोडी पडद्यावर दिसणार आहे. त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. हा पाठिंबा रसिक प्रेक्षकांकडून मिळावा हीच अपेक्षा आहे.