शैलेंद्र चौधरी नंदुरबार
नंदुरबारचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून गडचिरोली येथील अप्पर पोलीस अधीक्षक भापोसे महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी मल्हार न्यूज दिली आहे, तर नंदुरबारचे पोलिस अधीक्षक संजय पाटील यांची धुळे येथे राज्य राखीव बल गट क्र,6 धुळे समादेशक म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे
भारतीय पोलिस सेवेतील पोलिस अधीक्षक/पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली करून पदस्थापना करण्याचे आदेश महाराष्ट्रचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य कैलास गायकवाड उप सचिव गृह विभाग यांनी दिले आहेत.