तक्रारवाडी येथे पोलिसांच्या गाडीला अपघात पालखी महामार्गावर आठ दिवसात तीन अपघात

748

संतोष डुबल

खळद (प्रतिनिधी): सासवड-जेजुरी पालखी महामार्ग वर तक्रारवाडी (ता.पुरंदर)येथे ठाणे सिटी पोलिसांची गाडी व पिक अप यांच्यात जोरदार अपघात रात्री 9:45 ला झाला यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
महिंद्रा बोलेरो क्रमांक एम एच.04 ई पी0193 सरकारी पोलिसांची गाडीही सासवड वरून जेजुरी कडे निघाली होती व महिंद्रा पिकअप एम एच 13 सी क्यू 0608 ही गाडी जेजुरी वरून सासवड कडे निघालेली असताना दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे.
या अपघातामध्ये पोलीस कर्मचारी चालक निलेश दत्तात्रय निगडे यांच्या पायाला जबर दखापत झालेली असुन जेजुरी येथे खास खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पालखी महामार्ग सासवड ते जेजुरी हा अत्यंत धोकादायक रस्ता झाला आहे. काही ठिकाणी रस्ता आरूंद झालेला असल्यामुळे चालकांना समजून येत नसल्याने या आठ दिवसांमध्ये तीन अपघात झाले आहेत. या अपघातांची मालिका सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र सुस्त अवस्थेत बसलेले आहे.
…………।।।।।।।।।।…………..