अवैध गौणखनिज वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश

1301

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी बालाजी मंजुळे यांनी जिल्ह्यातील नंदुरबार शहर तालुका व उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावांना फौजदारी प्रक्रिया संहिता1973चे कलम 144(1)व(3)प्रमाणेप्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत आदेशानुसारजिल्ह्यातील
तापी काठालगतच्या शहादा
तालुक्यातील बामखेडा,टेंभे बु.
,देऊर/कमखेडा,सारंगखेडा-1 व 2,कौठळ तसा,कुऱ्हावद तसा,ससदे-1व2,बिलाडी तसा, बामखेडा तसा,नांदरखेडा,शेल्टी-1व2व पळासवाडा,
नंदुरबार तालुक्यातील सावळदा, बोराळे,सुजालपूर,नाशिंदे,
आराळे,ओसर्ली,अमळथे व कोपर्ली,नवापूर तालुक्यातील बोकळझर व नवागांव या गावांच्या हद्दीतील स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना प्रतिबंध अंमलात आणण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.
जमीन महसूल अधिनियम कलमाप्रमाणे कार्यवाही करणे सक्षम महसूल अधिकारी/कर्मचारी यांची भरारी व स्थायी पथकांची नियुक्ती करण्यात येत असते परंतु अशा प्रकारच्या कार्यवाही करताना अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहतूकदार यांच्याकडून महसूली अधिकारी/कर्मचारी यांना अटकाव करून गंभीररित्या मारहाण केली जात असते.
अशा घटनांमुळे जिल्ह्यात सार्वजनिक उपद्रव व सुव्यवस्थेचा प्रश्न वेळोवेळी निर्माण होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील तापी नदी पात्रासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी जेथे वाळू आहेत तेथे अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर,ट्रक, हायवा,डंपर,जेसीबी,पोकलॅण्ड व तत्सम सर्व वाहने वाहनचालक कंत्राटदार व मजूर कामगार यांना प्रतिबंध करण्यासाठी सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

 

मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व स्तरावरील प्रथमता गरोदर मातेला 5 हजाराचा लाभ

गर्भवती माता व स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा,यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात 1 जानेवारी 2017 पासुन कार्यान्वित केलेली आहे. माता
व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने त्यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राज्यातील प्रथमता गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारण 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर झालेली असेल अशा पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत
अपत्यासाठी दिला जात आहे.
या योजनेअंतर्गत 3 टप्प्यांमध्ये रु.5 हजार चा लाभ दिला जातोपहिल्या हप्त्यासाठी
संबधित लाभार्थ्याला मासिकपाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी शासकीय आरोग्यसंस्थेत करणे आवश्यक आहे दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजीपासून प्राथमिक लसीकरण(तीन महिने)पर्यंतचे संपूर्ण लसीकरण व त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यांनतर लाभार्थींच्या आधारलिंक बँक खात्यात जमा केला जातो या योजनेअंतर्गत आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील12हजार
500पात्र महिला लाभार्थ्यांना जवळपास 3 कोटी 95 लक्ष
अनुदान ऑनलाईन डीबीटी पद्धतीने थेट लाभार्थ्याच्या खात्यात वितरीत करण्यात आलेला आहे उर्वरीत लाभार्थ्यांनादेखील लाभमिळावा
यासाठी तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थानिहाय संबधित तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी तसेच तालुका समुह संघटक,
आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत सर्व पात्र
प्रथम खेपेच्या गरोदर मातांनी आरोग्य विभागातील आशा कर्मचाऱ्यांकडे त्वरीत नोंदणी करावी व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी केले आहे.