Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेइंडियन बिझनस क्लब (आयबीसी) तर्फे यशस्वी व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

इंडियन बिझनस क्लब (आयबीसी) तर्फे यशस्वी व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

व्यावसायिकांसाठी इंडियन बिझनस क्लब तर्फे शुक्रवारी मार्गदर्शन शिबिर

पुणे :  व्यवसायामध्ये नियमित येणा-या आव्हानांना योग्य प्रकारे सामोरे जाण्याबाबत व व्यवसाय वाढीबाबत आणि फॅमिली व्यवसाय व्यवस्थापनबाबत इंडियन बिझनस क्लब (आयबीसी)च्या वतीने व्यावसायिकांसाठी ’इंद्रधनुष’ या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
यशदा, बाणेर रोड पुणे येथे शुक्रवारी (दि. 19 जुलै 2019) रोजी सांयकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत दोन सत्रांमध्ये हे शिबिर संपन्न होणार आहे. आपलं छान चाललंय म्हणणार्‍यांना देखील वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असते. कारण दिवसेंदिवस व्यवसायामधील वाढत असणारी आव्हाने समोर आ वासून उभी असतात. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा सुरू असलेल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरणे गरजेचे असते. तसेच आपल्या फॅमिली व्यवसायापासून मुले दुर चालली आहेत. याबाबत एसपी जैन स्कूल ऑफ मॅनेजमेंट,मुंबई इन चार्ज ग्लोबलचे संचालक प्रा. डॉ. परिमल मर्चन्ट मार्गदर्शन करणार आहेत. तर व्यावसायिक संघर्षाचे व्यवस्थापन व व्यवसाय वृद्धी यावर मोटीव्हेशनल स्पिकर, कॉर्पोरेट ट्रेनर भुपेंद्रसिंग राठोड उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.  हे व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर सर्वांना निशुल्क आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे इंडियन बिझनस क्लब, पिंपरी चे अनिल मित्तल, नितेश मखवाना, दिलीप मॅथ्यूस, अभय खिवंसरा, दिपक बन्सल यांनी केले आहे. 
 शिबीरा बद्दल माहिती देताना अनिल मित्तल म्हणाले की, सक्षम समाज निर्मीतीसाठी वैचारीक प्रगल्भतेसोबतच आर्थीक पाठबळाची गरज असते. सामाजीक साक्षरते सोबतच औद्योगीक साक्षरता वाढली कि समाजाची वाटचाल विकासाकडे होऊ लागेल. कुटुंबव्यवस्थेत व्यक्ती हा घटक केन्द्रस्थानी आहे आणि समाजव्यवस्थेत कुंटुंब . म्हणून समाजव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी व्यक्तीला सक्षम करणे गरजेचे आहे..तरुण हे समाजाचे भविष्य आहे. समाजाचा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण समाजाच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे. तसेच फॅमिली व्यवसाय पुढच्या पिढीने वाढवावा हाच धागा धरुन समाजातून उद्योजकांची फळी निर्माण व्हावी यासाठी इंडियन बिझनस क्लब (आयबीसी) तर्फे यशस्वी व्यवसाय आणि फॅमिली व्यवसाय नियोजन विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले. आजची तरुण पिढी आपला फॅमिली व्यवसाय सोडून इतरत्र नोकरी शोधत असतात किंवा नोकरी करित असतात. अशा युवकांना उद्योजक बनविणविण्याच्या दृष्टीने फॅमिली व्यवसाय व्यवस्थापन यावर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. जेणे करून फॅमिली व्यवसायात सक्रीय होऊन शेकडो रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.
या मार्गदर्शन शिबीरात पुणे शहरातील यशस्वी उद्योजक आहेत तसेच फॅमिली व्यवसायात त्यांच्या मुलांचाहा योगदान आहे, अशा उद्योजक व्यवसायिकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती नितेश मखवाना यांनी दिली. या शिबीराचा लाभ सर्व उद्योजक आणि व्यवसायिकांनी घ्यावा असे आवाहन दिपक बन्सल यांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी  9420170080 या फोन नंबर वर किंवा लाीळिािीळऽसारळश्र.लेा  या मेल व्दारे संपर्क करावा. असेही यावेळी अभय खिवंसरा यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!