पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ

809

पुणे,

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत  पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ उपायुक्त, (पुरवठा)श्रीमती निलीमा धायगुडे यांच्याअध्यक्षतेखाली  16जुलै रोजी पार पडला.  यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी,श्रीमती अस्मिता मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारीश्रीमती अमिता तळेकर व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या जिल्हा नोडल अधिकारी  श्रीमती अनघा गद्रे उपस्थित होत्या.

                  पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा कालावधी   दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 आहे. या अभियानाचे प्रमुख उद्दिष्टे सर्व पात्र कुटुंबांना 100%  शिधापत्रिकावाटप करणे, सर्व पात्र शिधापत्रिकांना 100% धान्य वाटप करणे, सर्व कुटुंबांना 100%  गॅस कनेक्शन देणे हे आहेत.

            पुणे जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण  कुटुंबांना 100% गॅस कनेक्शन उपलब्ध करून देऊन सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे. तसेच कोणत्याही कुटुंबातीलमहिला चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जळाऊ लाकडाचा उपयोग करू नये. तसेच धुरमुक्त व चुलमुक्त महाराष्ट्र या अभियांतर्गत 100% गॅस वितरण उद्दिष्ट साध्य करणेहे या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

            या अभियांतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेविषयी पात्र लाभार्थी कुटुंबाविषयी व आवश्यक कागदपत्रांचे पुर्ततेविषयी सखोल माहिती श्री भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठाअधिकारी, पुणे यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. त्यानंतर श्रीमती अनघा गद्रे, जिल्हा नोडल अधिकारी  यांनी पंतप्रधान उज्वला गॅस  योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.

            या विशेष मोहिमेअंतर्गत  अन्न सुरक्षा योजनेतील  पुणे जिल्हयातील पात्र कुटुंबांना 100% शिधापत्रिका वितरीत करण्यात येणार असून त्याव्दारे निवड करण्यात आलेल्या पात्रशिधापत्रिकाधारकांना 100% धान्य वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणेबाबतचे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारीश्री.गायकवाड यांनी  सर्व तालुका स्तरावरील अधिकारी ,कर्मचारी यांना  केले.

            पुणे जिल्हयातील  सद्यस्थितीत जिल्यामध्ये एकूण 1 लाख 42 हजार 649  इतके गॅस कनेक्शन उज्वला योजनेंतर्गत देणेत आलेले असून जिल्हयामध्ये  एकूण 73 हजार 899लाभार्थ्यांना 252 के.एल. इतके केरोसीन वाटप करणेत येत आहे. तरी तालुका स्तरावरून 73 हजार 899 लाभार्थ्यांना  संबंधित गॅस डिलर कडून आवेदन पत्र (KYC) भरून घेऊन उज्वलायोजनेंतर्गत गॅस कनेक्शन देण्याचे उदिष्ट या विशेष मोहिमेंतर्गत 100% पूर्ण करण्याच्या सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी व पुणे जिल्हयातील सर्व गॅस वितरक यांना  करण्यात आल्या .

            जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हयातील सर्व गॅस वितरक तसेच सर्व तहसिल कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.