माधव देवचकेला बिग बॉस मराठी जिंकण्यासाठी राखी सावंतने दिल्या शुभेच्छा

573

मल्हार न्यूज,पुणे 

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातला स्ट्राँग कंटेस्टंट माधव देवचकेला अभिनेत्री राखी सावंतने शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस हा रिएलिटी शो भारतात 2006ला सुरू झाला. बिग बॉस हिंदी च्या 2006च्या सर्वात पहिल्या पर्वात अभिनेत्री राखी सावंत कंटेस्टंट होती. ती टॉप-5 पर्यंत हा शोमध्ये राहिली होती. आता बिग बॉसमध्ये तशाच पध्दतीने माधवही टिकुन राहावा म्हणून राखीने शुभेच्छा दिल्या आहेत.

राखी सावंत म्हणते, “माधव खुप चांगला माणुस आहे. तो खुप चांगला कलाकार आहे. त्यामुळे त्याला भरघोस मत द्या. आणि माधव तुला बिग बॉसच्या घरातून बाहेर यायचं नाही आहे. तू जिंकुनच ये. माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. ”