गणेश जाधव, पुणे
कोंढवा खुर्द येथील श्री संत गाडगे महाराज शाळेच्या हॉलमध्ये मनपा ५ बी शाळेच्या शिक्षिका लक्ष्मी पेवेकर यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित केला गेला. यावेळी आजी माजी शिक्षक भावुक झाले होते.समारंभास शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,रखवालदार तसेच पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे कोंढवा रामटेकडी विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, पर्यवेक्षिका काळे ,मोरे तसेच शाळेचे आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.. सेवापूर्ती समारंभास उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले..तसेच सौ.पेवेकर यांनी केलेल्या २२ वर्षाच्या शैक्षणिक कार्यकालात त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या यशाचा आलेख उपस्थित मान्यवरांनी मांडला ..सदर सेवापूर्ती समारंभ निवृत्त मुख्याध्यापक लांडगे गुरुजी ,गडदे , माजी पर्यावेक्षक खंडागळे , कुलकर्णी यांनी देखील आपली उपस्थिती दर्शविली. लक्ष्मी पेवेकर यांनी केलेल्या २२ वर्षाच्या शैक्षणिक सेवेत त्यांनी अनेक मुले घडवली व ती मुलं उच्चशिक्षित केली ,त्या मितभाषी, सुस्वभावी तसेच कष्टाळू आहेत निवृत्तीनंतर एक स्वछंद आयुष्य जगा” असे मत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी व्यक्त केले. आपल्या मनोगतात पेवेकर यांनी आपल्या २२ वर्षाच्या शैक्षणिक सेवा कार्यकाळात कशा पद्धतीने कुटुंबाच्या जबाबदार्या सांभाळून एक आदर्श शिक्षक कसा घडला जातो याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या मनोगतात दिले.. प्रत्येकाने आपण समाजाला काहीतरी देणे लागतो याचे भान बाळगून “एक तरी झाड लावा व आपला वृक्ष संवर्धनाचा वसा कायम ठेवा “असा संदेश देखील त्यांनी दिला तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन आदर सत्कार केला तसेच प्रत्येकाला एक रोपवाटिका भेट म्हणून दिली. सेवापूर्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले.