शेवगाव तालुका शालेय विद्यार्थीनीचा विज अंगावर पडून मृत्यू

876

कमलेश नवले,नेवासा शेवगाव

शालेय विद्यार्थीनीचा विज अंगावर पडुन दुदैवी मुत्यु झाल्याची घटना शेवगाव तालुक्यातील खामगाव येथे झाली शेतात कपाशी खुरपणी करत असताना अचानक सुरू झालेल्या पावसामुळे घराकडे आडोशाला जात आसताना विज अंगावर कोसळून शालेय विद्यार्थ्यांनीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी मुलीचे नाव शुभांगी राजु शिंदे ( वय 14 वर्षे ) असुन शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती. परिसरातील मंडळीना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन मदत केली. सदर मृतदेह 108 रुग्णवाहिखेतुन शेवगाव येथील शासकीय आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले रात्री उशिरा शुभांगी च्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपत्कालीन नैसर्गिक घटनेत दुर्दैवी मृत्यू पावलेल्या शुभांगी च्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.