शैलेंद्र चौधरी, नंदुरबार
जिल्हापरिषद शाळा काल्लेखेतपाडा ता.धडगाव जि.नंदुरबार येथे बाल ससंद निवडणूक प्रक्रिया दि.20/7/2019 दिनांक १५ जुलै रोजी जि.प शाळा.काल्लेखेतपाडा ता. धडगाव येथे बाल ससंद या उपक्रमा अंतर्गत भारताच्या लोकशाहीचा अभ्यास करता यावा याकरीता शालेय स्तरावर शाळेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निवडीसाठी निवडणूक घेण्याविषयी चर्चा झाली त्यासाठी निवडणूक समित्या तयार करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने मुख्यनिवडणूक अधिकारी,निडणूक वाटप समिती,आचारसंहिता समिती व इतर समित्यांच्या माध्यमातून कामास सुरुवात करण्यात आली दि.20/7/2019 शनिवार रोजी निवडणूक घेण्याविषयी चर्चा करण्यात येऊन समंती देण्यात आली तसेच इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये उमेदवार निवडीसाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला निवडणूक प्रक्रिया दि.15/7/2019 रोजी निवडणुकी संदर्भात घोषणा करण्यात आली दि.16/7/2019 रोजी उमेदवारी अर्ज भरणे व माघार घेणे दि.17/7/2019 रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले दि17/7/2019 ते 19/7/2019 रोजी या तीन दिवशी निवडणूक प्रचार करण्यात आले.दि 20/7/2019 रोजी सकाळी 8:00 ते 9:30 पर्यंत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले सकाळी 10 वाजता मतमोजणी करण्यात आली सकाळी 10.30 वाजता निकाल घोषित करण्यात आला.
निवडणूक समितीत मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून रुपेशकुमार दिगंबर नागलगावे हे होते,चिन्ह वाटप समितीत लक्ष्मीपुत्र विरभद्रप्पा उप्पीन, आचारसहिंता समिततीत दशरथ उग्रावन्या पावरा,मतदार यादी व घोषित करणे (बीएलओ)म्हणून तेगा शंकर पावरा,निवडणूक अधिकारी वर्ग म्हणून मतदान अधिकारी 1 कु.संदीप माल्सिंग पावरा,मतदान अधिकारी 2 म्हणून सुकी सुकलाल पावरा,मतदान अधिकारी 3 म्हणून शीतल किसन पावरा,केंद्रसंचालक म्हणून रोहित बाबुराव पावरा,झोनल अधिकारी म्हणून तालुका मतदान अधिकारी 1 तालुका मतदान अधिकारी 2 पोलीस 2 म्हणून पवन बाबुराव पावरा,पोलीस 2 म्हणून गणेश दिलीप पावरा,मतमोजणीअधिकारी 1,मतमोजणी अधिकारी 2, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे दिनांक 16/7/2019 रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या सहमतीने निवडणूक उमेदवार म्हणून खालील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
अ नू क्र उमेदवार नावे लिंग इयत्ता
1 कु.नान्या रमेश पावरा पु. 7 वी
2 कु.मनीषा अंधार्या पावरा स्त्री.6 वी
3कु.मोज्या लेहऱ्या पावरा पु. 6 वी
4 कु.मोगी रमेश पावरा स्त्री.7 वी
दिनाक 17/7/2019 रोजी एल. व्ही.उप्पीन यांच्या अध्यक्षेखालील समितीने उमेदवारांना चिठयांच्या आधारे चिन्ह वाटप करण्यात आले.
अ.क्र उमेदार नाव चिन्ह
1 नान्या रमेश पावरा कपबशी
2 मनीषा अंधार्या पावरा गुलाबफुल
3 मोज्या लेहऱ्या पावरा चेंडू
4 मोगी रमेश पावरा पेन
दिनाक 17/7/2019 मते 19/7/2019 पर्यंत विद्यार्थ्यांना प्रचारासाठी वेळ देण्यात आली होती दशरथ उग्रावन्या पावरा यांच्या आचारसंहिता समितीच्या निगराणीत प्रचार कार्यात पूर्ण लक्ष देण्यात आले होते.
दिनाक 20/7/2019 शनिवार रोजी सकाळी ठीक 8 वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली सकळी 9:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडण्यात आली सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन सर्व उमेदवारास खालीलप्रमाणे मत मिळाली आ. क्र उमेदावार नाव चिन्ह पडलेली मते
1 नान्या रमेश पावरा कपबशी 04
2 मनीषा अंधार्या पावरा गुलाबफुल 50
3 मोज्या लेहऱ्या पावरा चेंडू 33
4 मोगी रमेश पावरा पेन 51
दिनांक 20 /7/2019 रोजी सकाळी10.30 वाजता मतमोजणी अधिकारी यांनी मोगी रमेश पावरा यांस 01एवढ्या मताने विजयी घोषित केले.