मल्हार न्यूज,पुणे
मोनिका शेख यांच्या मार्गदर्शनाखाली “रेनिंग मिस इंडिया 2019” ह्या मिसेस इंडिया स्पर्धा आणि पुरस्कार पुण्यातील हॉटेल ऑर्चिडमध्ये पूर्ण झाली. या कार्यक्रमात महिलांनी त्यांचा तलख बुद्धी, सौंदर्या वर “रॅम्प वॉक वर उतरून “रेनिंग मिस इंडिया 2019” चा पुरस्कार पटकाविला . वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ मोठ्या पदावर असणाऱ्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाच्या निर्मात्या , प्रस्तुत्कर्त्या मोनिका शेख आणि इम्रान शेख यांच्या साह्याने पुरस्कार सोहळा पार पडला.
हि स्पर्धा ‘गोल्ड अँड प्लॅटिनम’ या दोन विभागांमध्ये विभागली गेली होती , ज्यामध्ये भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणा वरून आलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. पुण्याच्या मिस प्रेमा पाटील यांना सुवर्ण तर मिस मधुसा कट्टा ह्या प्लॅटिनम विजेते ठरल्या. प्रथम धावपटू श्रीमती बिन्ना कार आणि सौ. हेतला गाला अनुक्रमे सुवर्ण व प्लॅटिनमचे विजेत्या ठरल्या. सुवर्ण व प्लॅटिनममध्ये अनुक्रमे मिस स्नेहा साखिता आणि श्रीमती पूजा झा यांनी द्वितीय धावपटू विजेत्या ठरल्या.
पुणे पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. अंतिम फेरीत पाटील यांनी “जी २० समिट “ या विषयावर दृकश्राव्य सादरीकरण केले. नृत्य सादरीकरणा बरोबर परीक्षकांच्या प्रश्नाची उत्तरे देत “रॅम्प वॉक “ वर उतरून त्यांनी “मिसेस इंडिया २०१९” हा किताब पटकाविला. महिलांनी आपल्या आवडी-निवडीना वाव द्यावा तसेच प्रंचंड मेहनत आणि आत्मविश्वासाने सर्व काही शक्य होते असे त्या यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच कुटुंबाच्या सहकार्याने मी स्पर्धा जिंकू शकली, असे पाटील यावेळी म्हणाल्या.
मोनिका शेख याप्रंगी बोलताना म्हणाल्या कि, हि स्पर्धा घेण्यामागे महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणे, तसेच या माध्यमातून महिलांचे विचाराचे व्यासपीठ निर्माण करणे होते. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असल्याने स्पर्धा खुपच आवाहनात्मक होत्या, पण स्पर्धकांचा प्रचंड उत्साह मला एक नवीन उर्जा निर्माण करत होती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा सोहळा झाला. पती इम्रान शेख यांच्या पाठींब्यामुळे मला प्रंचड उर्जा मिळाली.
‘रेनिंग मिसेस इंडिया 2019’ च्या पहिल्या हंगामाच्या ज्युरी श्रीमती सुर्यवंशी, अलीशा मार्ग, अर्चना तोमर,चंद्र सानप, अमित तलवार आणि राकेश सभरवाल यांनी विजेते निवडताना आव्हानात्मक भूमिका बजावली.