वडिलांनी ‘गेम’ खेळायला मोबाईल दिला, मुलाने त्यांचाच ‘खेळ खल्लास’ केला

708

तनवीर बागवान,

बंगळुरूवडिलांनी आपल्या मुलाला मोबाईल खेळायला दिल्यानंतर मुलाने चक्क वडिलांचेच अफेयर शोधून काढल्याची घटना बंगळुरूतून उघडकीस आली आहे. या 15 वर्षीय मुलाने अनावधानाने वडिलांच्या मोबाईलमधील व्हॉईस रेकॉर्डींग आणि व्हॉट्सअॅप चॅट ओपन केले. विशेष म्हणजे ही बाब तात्काळ आपल्या आईलाही सांगितली. त्यामुळे मुलाला मोबाईल देणे वडिलांना चांगलेच महागात पडले आहे.

बनशंकरी 3 येथील रहिवाशी असलेल्या शिक्षिका नंदिनी (नाव बदललेले) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीतून आपल्या नवऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नंदिनी यांनी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, 43 वर्षीय नागराजू एम यांनी आपल्या 15 वर्षीय मुलास खेळण्यासाठी मोबाईल दिला होता. मात्र, मुलाला मोबाईल देणं या वडिलांच्या चांगलच अंगटल आलं आहे. या घटनेमुळे नागराजू यांचा 15 वर्षांचा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे.

याप्रकरणी 11 जुलै रोजी सीके. अच्चुकट्टू पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. या तक्रारीत नागराजू यांनी मला धमकी दिल्याचं नंदिनी यांनी म्हटलं आहे. याबाबत कुटुंबातील कुठल्याही सदस्याला न सांगण्याची धमकी पती नागराजू यांनी दिली आहे. दरम्यान, वडिलांच्या मोबाईलमध्ये गेम खेळताना मुलाने वडिल आणि त्यांच्या प्रेयसीमधील प्रेमसंबंधाचे रेकॉर्डींग ऐकले होते. तसेच वडिलांनी प्रेयसीसोबत केलेले व्हॉट्सअॅप चॅटही पाहिले होते. त्यानंतर, तात्काळ आपल्या आईलाही याबाबत माहिती दिली. त्यामुळे नागराजू यांच्या सुखी संसारात बाधा निर्माण झाली आहे.