रोटरी क्लब मगरपट्टा एलाईटच्या अध्यक्षपदी अर्चना गोजमगुंडे

568

पुणे प्रतिनिधी,

महिलांचारोटरी क्लब असलेल्या पुणे मगरपट्टा एलाईटच्या अध्यक्षपदी रो.अर्चना गोजमगुंडे यांची निवडकरण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रो.उज्ज्वला भोसले यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सेक्रेटरीपदी रो.शलिनी भंगानिया यांची निवड झाली.हॉटेल कोकिता हडपसर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो.रवी धोत्रे,आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रांतपाल रवी धोत्रे यांनी सामाजिक कार्य करतांना ते डोळसपणे करावे,व कार्याचा दर्जा उत्तम राखावा असे संगितले.नवनिर्वाचित अध्यक्षा अर्चना गोजमगुंडे यांनी आगामी काळात महिला सदस्यवाढ,पाणी आणि पर्यावरण,शाळांत आरोग्यतपासणी,रक्तदान शिबीर,वृक्षारोपण,गोदान,शोषखड्डे व बोअरवेल पुनर्भरण इत्यादि प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.