Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeउत्तर-महाराष्ट्रनंदुरबारउम्मीद एजुकेशनल संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार

उम्मीद एजुकेशनल संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

धुळे येथील उम्मीद एज्युकेशनल अंडर वेल्फेअर संस्था व महाराष्ट्र गुजरात रिलेटिव्ह अल्पसंख्यांक गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमात महाराष्ट्र गुजरात मधील नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई येथील शेख मिस्बाह अंजुम,प्रमुख पाहुणे ॲड.सैय्यद रजीयोद्दीन नवसारी,सैय्यद मेजर हुसेन जळगांव,शेख रहीमोद्दीन धुळे,शेख वसीम एरंडोल,शेख आसिफ कल्याण,शेख कमर अहमद धुळे,शेख हाजी सलाहुद्दीन धुळे,शेख अजीजोद्दीन जामनेर,सैय्यद सलीम अली नवसारी,शेख सलीमोद्दीन कल्याण,मलिक नाजिम जळगांव,यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र गुजरात मध्ये मध्ये दहावी बारावी माध्यमीक शालान्त परीकक्षेत प्रथम आलेले मलिक अरशिया नियाजोद्दीन जळगांव 12 वि विज्ञान 81.23%,सय्यद तनजिला आसिफ नवसारी 12वि वाणिज्य 96.04%,शेख सिदरा नाज रईस नवापूर 12वि 78.20% व महाराष्ट्र-गुजरातमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांक वर आलेले तेरा विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र,ट्रॉफी,पाचशे रुपये रोख,हातातील घडयाळ,बॉल पेन आणि कंपास देण्यात आले तसेच धुळे शहरातील नातेवाईक मधील पहिली ते नववी पर्यंत गुणवंत 70 विद्यार्थ्यांच्या गुणगौरव प्रमाणपत्र बॉलपेन कंपास किट आणि गुलाबाचे फुल देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने संख्येने महाराष्ट्र,गुजरातील नातेवाईक उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उम्मीद एज्युकेशनल संस्था अध्यक्ष सलीम शेख,उपाध्यक्ष जहिकोद्दीन शेख,सचिव ॲड, हनीफ शेख,सहरकफ सचिव नईम शेख,सदस्य अजीम शेख, सदस्य आसिफ मिर्झा,सदस्य मुनौव्वर शेख व सर्व नातेवाईकांचे सहकार्य मिळाले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!