Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेक्षितिजावर अधिक मोठे आणि चांगले प्रकल्प उदयाला येत आहेत– गौरांग दोशी

क्षितिजावर अधिक मोठे आणि चांगले प्रकल्प उदयाला येत आहेत– गौरांग दोशी

मल्हार न्यूज,पुणे

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत निर्माण केलेला आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडणारा “आंखे” हा चित्रपट, नंदिता दास यांचा टीकाकारांनीही वाखाणलेला “सँडस्टोर्म” आणि अनेक मोठया कलाकारांना घेऊन निर्माण केलेला “दीवार”. या आपला ठसा उमवटवणाऱ्या चित्रपटांचे निर्माता गौरांग दोशी. चला आपल्या कलाकारांना घरी आणू या! बॉलीवूडमधे प्रवेश केलेल्या वयाने सर्वात लहान निर्मात्याचे नाव गौरांग दोशी, ज्याने चार वेळा “लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड” आपल्या नावावर केले आहे. आगामी मोठ्या चित्रपटांच्या घोषणेच्या वळणावर असताना त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले आहे की ते काहीतरी खूप मोठे प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ते म्हणतात, “मी डिजिटल व्योमाकडे लक्ष ठेवून आहे आणि मला कटिंग एज विषय आवडतात. प्रत्येक निर्मिती ही तिचे खास वैशिष्ट्य पडद्यावर प्रस्तुत करीत असते आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे विषय मी निर्माण करू शकेन.”
या सुप्रसिद्ध निर्मात्याला आपल्या एका न्यायालयीन प्रकरणात यशस्वी अपील दाखल केल्यानंतर थोडी विश्रांती मिळाली आहे. नुकत्याच न्यायालयाच्या बेअदबीच्या प्रकरणात गोवले गेले असताना ते न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहू न शकल्याने “जाणीवपूर्वक न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे” या आरोपासाठी 6 महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा होऊ शकली असती. परंतु गौरांग दोशी यांच्या दिनांक 10 जुलै 2019 रोजी या पात्र अशा विजयासाठी माननीय मुख्य न्यायाधीश श्री प्रदीप नंद्रजोग आणि माननीय न्यायाधीश एन एम जामदार यांच्या उच्चस्तरीय न्यायालयीन समितीने एका महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे न्यायालयाच्या बेअदबीसम्बन्धी त्यांच्यावरील आरोप रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
त्यांच्या पुढील प्रवासासंबंधी बोलताना निर्माते असेही म्हणाले की, “प्रत्येकाच्याच जीवनात चढ- उतार असतात आणि एकूणच मला असे वाटते की मला हवे ते करणे शक्य असल्याने मी भाग्यवान आहे. मला माझ्यावर काही लादलेल्या अडचणी आल्या आणि कदाचित त्या अधिक वाढतीलही, परंतु मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे आणि त्यातून काहीतरी आश्चर्यकारक निर्मिती करून प्रेक्षकांसमोर त्यांना बघायचे असतील असे विषय प्रस्तुत करीन. या उद्योगात नवीन दाखल झालेल्या काही तरुण प्रतिभावान तरुणांसोबत काम करण्याचे मी ठरवतो आहे कारण ते जे काही करीत आहेत त्या कामाने मी अतिशय प्रभावित झालो आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!