आयकर विभागाचा कोंढव्यात छापा

1531

कोंढवा प्रतिनिधी,

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घर तसंच साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला.

आयकर विभागाची टीम आज (25 जुलै) पहाटे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली. आयकर विभागाने हसन मुश्रीफ यांच्या मुलगा राहत असलेल्या कोंढवा परिसरातील अशोका म्युझ सोसातील RH 4/5 बंगल्यावर आज सकाळी सात च्या सुमारास छापा टाकला. आयकर विभागाचे अधिकारी कर्मचारी या छाप्याबाबत कमालीची गुप्तता पाळत असून अधिक माहिती देण्यास नकार देत आहेत.

त्यांच्या साडूच्या घरावरही छापा टाकला आहे. परंतु छाप्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या छाप्यांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.