जनसुनावणीद्वारे बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न -संतोष शिंदे

747

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे 26 जुलै रोजी आयोजित जनसुनावणीच्या माध्यमातून बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा व त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याने अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संतोष शिंदे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीबाबत आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड,विधी सेवा प्राधिकरणाचे न्या.सतिष मलिये, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सल्लागार अजिश आय.आर.अभिकाष त्यागी, पूजा जासवानी,सुगंधा जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापुराव भवाने,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही.डी.
वळवी आदी उपस्थित होते.
बैठकीत जनसुनावणीच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली जनसुनावणीसाठी अधिकाऱ्यांनी माहितीसह उपस्थित रहावे आणि बालकांच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी दिले बैठकीला विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जनसुनावणीसाठी बालकांच्या हक्काशी संबधीत कोणतीही तक्रार किंवा समस्या मांडता येणार आहे जनसुनावणी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता सुरू होणार असून तक्रार अथवा अर्ज करावयाचा असल्यास नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी नियोजित वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ.भारूड यांनी केले आहे.
—-
‘उरी-द सर्जिकल स्ट्राईकचे’ मोफत प्रदर्शन

जिल्हा प्रशासनातर्फे कारगिल विजय दिनानिर्मित 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील चार प्रमुख सिनेमागृहातून‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.
युवकांच्या मनात देशाच्या सैन्याबद्दल अभिमानाची भावना वृद्धींगत होण्यासाठी हा चित्रपट मोफत दाखविण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात चित्रपट मालक व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत युवकांना चित्रपट प्रदर्शनाबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले नंदुरबार येथील एनबीसी सिनेफ्लेक्स आणि अमर चित्रमंदिर तसेच शहादा येथील मनोरंजन चित्रमंदिर आणि पटेल सिनेफ्लेक्स या चित्रपटगृहात हा चित्रपट शुक्रवारी सकाळी 10 वाजता मोफत दाखविण्यात येणार आहे या चारही चित्रपटगृहाची एकूण आसनक्षमता 1930 आहे. युवकांनी चित्रपट पहावा आणि देशाच्या सैन्याविषयी अभिमानाची भावना कारगिल विजय दिनी व्यक्त करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
—-
उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी गुरुवारी अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांना भेट देऊन पाहणी केली यावेळी 41 कर्मचारी उशिरा आल्याचे लक्षात आल्याने या कर्मचाऱ्याना नोटीस देण्याचे व एक दिवसाची किरकोळ रजा कमी करण्याचे निर्देश यावेळीजिल्हाधिकाऱ्यांनी दिले यापुढे देखील विविध कार्यालयांची अशाच स्वरुपाची अचानक पाहणी करण्यात येणार आहे गैरहजर राहणाऱ्या व उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन शिस्तीचे पालन करावे,असे आवाहन डॉ.भारूड यांनी केले आहे.
—-