चिमुकलीचा जीव वाचविणाऱ्या विद्यार्थ्याचा सन्मान

759

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

रविवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील बालवीर चौक नवी भोई गल्ली परिसरातील उघड्या ड्रेनेजमध्ये चार वर्षीय चिमुकली यामिनी राकेश भाई खेळता-खेळता पडली होती तिच्या नाकातोंडात सांडपाणी गेले होते यावेळी तेथून जाणाऱ्या ओम विनोद चौधरी इयत्ता सहावी या विद्यार्थ्याने क्षणाचाही विलंब न लावता या चिमुकली चा हात धरून तिला उघड्या ड्रेनेज मधून तात्काळ बाहेर काढले यामुळे चिमुरडी यामिनी ला जीवदान मिळाले ओम चौधरी याने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करीत शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे आज ओम चा पालकांसह त्याचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक विठ्ठल हिरणवाळे यांच्या हस्ते ओम चौधरी यास शौर्याचे प्रतिक म्हणून हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांची प्रतिमा आणि शालेय साहित्य भेट म्हणून तसेच रोख बक्षीस देण्यात आले याप्रसंगी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी एस गवळी डॉक्टर गणेश ढोले गोपाल हिरणवाळे सुभाष चौधरी साहूल कुशवाह तसेच ओम चे पालक सौ सीमा विनोद चौधरी विनोद अरुण चौधरी चिमुरडी यामिनी भोई सौ ममता राकेश भोई राकेश मोहन भोई यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते