तनवीर बागवान,
नांदुर घाट दि.25 (प्रतिनिधी) केज तालुक्यातील दैटना गावांमधील सूर्यकांत उद्धवराव मुळे वय 56 वर्षे व्यवसाय शेती यांचा गुरुवारी सकाळी 25 जुलै रोजी मृतदेह बोरगाव शासकीय गायरानामध्ये आढळून आला. सकाळी दहाच्या सुमारास आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेतीच्या कामानिमित्त शेतामध्ये गेले असता काहीतरी पडल्यासारखे शेतकऱ्यांना आढळून आलं आणि जवळ गेल्यानंतर एक व्यक्ती पालथा पडलेला अवस्थांमध्ये रक्तबंबाळ दिसून आला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनांना तात्काळ फोन केले असता पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनाने पंचनामा केला यामध्ये सूर्यकांत उद्धवराव मुळे वय 56 वर्षे व्यवसाय शेती हे आहेत म्हणून पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने अंबूलस द्वारे मृतदेह पोस्टमार्टम साठी केज येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केला. आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या चर्चेनुसार सकाळी दहा पर्यंत सूर्यकांत उद्धवराव मुळे यांचा जीव श्वासोश्वास चालू होता. नंतर काही वेळाने त्यांचा जीव निघून गेला आता या घटनेने परिसरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागे कुणाचा हात असू शकतो किंवा कोण करू शकतो हे अद्यापही निदर्शनास आले नाही. पुढील तपास डी. वाय. एस. पी. आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मारुती मुंडे, पोलीस नाईक सोनवणे, पोलीस नाईक जाधव, पोलीस नाईक नामदास पोलीस नाईक गायकवाड पुढील तपास करत आहेत.