पोलिसांनी केल्या मौल्यवान वस्तू परत

603

पुणे प्रतिनिधी

पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेमधून आणि पोलीस सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कॉप्स एक्सलन्स हॉल येथे गुन्ह्यातील किमती व मौल्यवान माल पुनःप्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास अशोक मोराळे अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) पुणे शहर, बच्चन सिंह, पोलीस उप आयुक्त [गुन्हे] व इतर परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस निरीक्षक व संबंधित पोलीस स्टेशनचे मुद्देमाल कारकून व फिर्यादी मालक असे एकूण ३०० लोक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये विविध पोलीस स्टेशनकडील एकूण ७३ गुन्ह्यांतील रुपये १,१८,७०,९००/- किमतीचे सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, वाहने असा मुद्देमाल अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते संबंधित फिर्यादी व मालकास पुनः प्रदान करण्यात आला. अशोक मोराळे यांनी उपस्थितांना सीसीटीव्ही लावण्याबाबत तसेच आवश्यक तेथे वॉचमन नेमण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर उपस्थितांपैकी काहींनी मुद्देमाल परत मिळवून देणेकामी पोलिसांच्या कामगिरीबाबत त्यांचे अभिनंदन केले व पोलिसांच्या तातडीने मिळालेल्या सहकार्याबाबत विशेष आभार व्यक्त केले.सदर कामाचे सूत्रसंचालन डॉ.  शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त अभियोग, [गुन्हे] पुणे शहर व प्रस्तावना  बच्चन सिंह, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), पुणे शहर यांनी केले असून आभार प्रदर्शन अजित लाकडे, पोलीस निरीक्षक पीसीबी (गुन्हे), पुणे शहर यांनी केले.