शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीच्या मृत्यूने खळबळ

1053

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

आज नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा जवळील शिर्वे येथील राहिवासी असलेल्या मयत जयश्रीच्या संतप्त नातेवाईकांनी तिच्या संशयास्पद मृत्युची सखोलपणे चौकशी करून आरोपींना कार्यवाही करण्यात येउन त्यांना निलंबीत करण्यात यावे यासाठी आंदोलन केले होते सहावीत शिकणाऱ्या जयश्री वसावे हिची गेल्या आठ दिवसांपासुन संडास उलट्या होत असल्याने प्रकृती खराब होती मात्र नातेवाईक दोन वेळा आश्रमशाळेत जावुन सुद्धा मुलीला घेण्यासाठी पालक स्वतः गेले परंतु आश्रम शाळा प्रशासनाने ताब्यात दिले नाही त्यामुळे काल अचानक जयश्रीची प्रकृती जास्त खराब झाल्याने तिला आश्रम शाळेच्या शिक्षिका यांनी प्रथम खांडबारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व तद्दनंतर पुन्हा तिच्या प्रकृतित सुधारणा न झाल्याने काल दुपारी अचानक तिच्या प्रकृतित अस्वस्थता जाणवू लागल्याने तिला अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलविण्यात आले परंतु तिचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नावली आश्रम शाळेच्या आवारात नेत असतांना दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले तरी देखील तीस अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात काल सायंकाळी दाखल करण्यात आले परंतु ती मयत झाल्याचे ररुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी घोषीत करण्यात आले होते तर उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला असल्याचे आश्रम शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे यानंतर शवविच्छदनानंतर तिच्या पालकांनी मृतदेह घरी नेण्यास नकार दिला शिर्वे येथील रहिवासी असलेल्या जयश्रीच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी यानंतर नावली आश्रमशाळेत आंदोलन सुरु केल्यानंतर प्रकल्प कार्यालयातील प्रशासनासह नवापूर तहसिलदार आणि नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी घटनेप्रकरणी दोषींवर कारवाईच्या लेखी आश्वासनानंतर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे मात्र आश्रमशाळेतील अनागोंदी व निष्क्रिय अधिकारी व कर्मचारी यांच्या अनास्थेचा जयश्री बळी ठरल्याचा आरोप आता होवु लागला आहे तर या सर्व घटनेला जबाबदार मध्यवर्ती भोजन पुरवठा व्यवस्था ज्याच्या माध्यमातून तिला आजार होऊन मृत्यु झाला असल्याचे नातेवाईकांकडून आरोप करण्यात येत होता तर आदिवासी विकास प्रकल्प विभागाने त्वरित ही सेंट्रल किचन बंद करून सर्व आश्रम शाळांत जागेवर अन्न शिजवुन मुलांना पूर्वीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात यावि या जेवणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे सांगितले गेले तसेच आश्रम शाळा प्रशासनाकडून नातेवाईक यांना येत्या 20 दिवसात संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात येणार असे लेखी आश्वासन देण्यात आले.