धुळे जिल्हा शरीरसैष्ठव स्पर्धेत हरपाल राजपूत मानकरी

722

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

शिरपूर क्लासिक 2019 शरीर सौष्ठव स्पर्धेत 85 खेळाडूंमधून हरपाल राजपूत याने प्रथम क्रमांक पटकवला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हास्तरीय शिरपूर क्लासिक 2019 तर्फे दि 4 आँगस्ट रोजी शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस समीर पाटील, ललित पाटील,संकेत धर्माधिकारी,दुर्गेश मोरे,दिपक सोनवणे,अनिल गोरे,शरीर सौष्ठव असोशिएशनचे धुळे जिल्हाध्यक्ष अनिल गोरे आदी उपस्थित होते या स्पर्धेत एकुण 85 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यात शिरपूर येथील हरपाल राजपूत याने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला हरपाल राजपूतने शिरपूर क्लासिक 2019 चा किताब विजेता ठरल्याने सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात आले या स्पर्धेत उपविजेता सुनिल देवरे तर मेन्स फिजिक्स ललित मोरे तर स्पर्धेचे पंच म्हणून जळगांव येथील नासिर शेख,शिर्डी येथील मयूर दरदले,दिपक पाटील,राहुल अम्रुतकर,आदी जण उपस्थित होते.