अक्कलकुवा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची आमदार पाडवी यांनी केली पाहणी

1548

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

अक्कलकुवा तालुक्यातील भराडीपादरचा घाटपाडा येथील 25ते30 घरातील ग्रामस्थ संतत मुसळधार पावसामुळे व देहली नदीच्या तिव्र प्रवाहमळे गेल्या 7 ते 8 दिवसापासून संपर्क बाहेर गेल्यामुळे अन्नपाण्याविना बेहाल झाले होते तर दुसऱ्या बाजूने रतनबारामागेँ गेल्यानंतर देखील 5 ते 6 किलोमीटर अंतरमागेँ देखील सिनकलनदी मुळे तो रस्ता देखील बंद झाला आहे. दोन्ही बाजूने गावकऱ्या ना निघण्यास मार्ग नसल्यामुळे अतोनात हाल होत असलल्याचे दृष्टीस पडले आमदार अँड.के.
सी.पाडवी हे अधिकारी व आपल्या सहकाऱ्यासह भराडीपादरचा घाटपाडा ग्रामस्थांना देहलीनदीच्या कठावरुन संभाषण साधुन गावासाठी अन्नधान्याची आपल्यापयत पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येईल व तसेच सोबत तालुक्याचे तहसीलदार, तलाठीसह भेट दिली आहे व तात्काळ प्रशासनाकडून सहकार्य होईल असे अश्वासित केले.