रोटरॅक्ट क्लब ऑफ युवा नेक्स्टच्या अध्यक्षपदी रोटरॅक्ट अमेय जोग

492

पुणे प्रतिनिधी

युवकांसाठीच्या रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे युवाच्या नेक्स्टच्या अध्यक्षपदी रोटरॅक्ट अमेय जोग याची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रोटरॅक्ट प्रियंका वाघोलीकर यांच्याकडून त्याने सूत्रे स्विकारली.सेक्रेटरीपदी रोटरॅक्ट आलोका काळे यांची निवड करण्यात आली. मराठा चेंबर्सच्या सेनापति बापटरस्ता येथील सुमंत मुळगावकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डिआरआर(डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटिव्ह) अक्षय मोरे,माजी डिआरआर प्रतीक जोशी,कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या साधना गोडबोले (प्रसन्न ऑटीझम सेंटर),आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी व रोटरॅक्ट उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना साधना गोडबोले यांनी ऑटीझम या विकारा विषयी लोकांत याविषयी महितीचा अभाव आहे,त्यामुळे युवा सदस्यांनी याबाबत जनजागृती करावी असे संगितले. मकॅनिकल इंजिंनियरिंगचे शिक्षण घेत असतांनाच सामाजिक कार्यात आवड असलेला नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरॅक्ट अमेय जोग याने बोलताना आगामी काळात युवकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :रोटरॅक्ट अमेय जोग