प्रामाणिक रिक्षाचालकाने केला मुद्देमाल परत

800

गिरीश भोपी, पनवेल

येथील  प्रामाणिक रिक्षाचालक आत्माराम दत्ता उलवेकर  यांच्या रिक्षात विसरलेले पैशाचे पाकीट व एटीम कार्ड तसेच इतर कागदपत्रे त्यांनी रिक्षातील प्रवासी यांना परत केली .

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नेरेपाडा येथील राम भगवान खुटले कामानिमित्त रिक्षाचालक आत्माराम उलवेकर यांच्या रिक्षात तळोजा एमआयडीसी विभागात गेले होते.त्यावेळी त्यांचे पाच हजार रोख, एटीएमकार्ड आणि काही महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट रिक्षात विसरले होते. यांनातर थोड्याच वेळात राम खुंटले यांच्या लक्षात आले की आपले पाकीट विसरले आहे .परंतु प्रामाणिक रिक्षाचालकाने त्यांना त्यांच्या पाकिटातील कागदपत्रांवरून फोन करून पाकीट आपल्याकडे असल्याचे व ते आणून देतो असे सांगून ते पाकीट परत केले.