अयोध्या कर्णबधिर विद्यालयात स्वतंत्र दिन रक्षाबंधन उत्स्फूर्तपणे साजरा,

694

पुणे प्रतिनिधी,

अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट च्या विशेष निवासी, कर्णबधिर विद्यालयात स्वतंत्र दिन रक्षाबंधन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.

15 ऑगस्ट  रोजी 73 भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त आयोध्या ट्रस्ट मध्ये झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिगेडियर मनोहरण निलहंट लिमिटेड पुणे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स संध्या दही वेल, ग्यान पंजाबी, पिटर, जयप्रकाश सोनी, श्रीकांत बाहेती, भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश हेमनानी ,ऍड किशोर बलीगर,दिनेश होले, घोमन, उमेश शिंदे तसेच अनेक नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,आयोध्या ट्रस्ट चे सचिव श्री,राजेन्द्र ढेरे, विश्वस्त डॉ,श्याम राजोरे ,संचालक लक्षमण कागणे, डॉ,पी,के,भगत , उपस्थित होते, या कार्यक्रमानंतर रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री,प्रशांतदादा जगताप माजी महापौर व विद्यमान नगरसेवक पुणे होते व प्रमुख पाहुणे वरील सर्व होते, यावेळी कर्णबधिर मुलींनी सर्वांना राखी बांधली व सौ रत्नप्रभा जगताप यांनी विद्यार्थ्यास राखी बांधून कार्यक्रम साजरा झाला,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक श्री, प्रशांत घाटके यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक लक्षमन कागणे यांनी केले.